तब्बल १७ सापांना दिले जीवदान

तब्बल १७ सापांना दिले जीवदान
तब्बल १७ सापांना दिले जीवदान
Snake

नंदुरबार : परिसरातून मागील वर्षभरात पकडलेल्‍या सापांना जीवदान देण्यात आले आहे. सर्पमित्रांनी पकडलेल्‍या तब्बल १७ सापांना जीवदान देत वन विभागाच्या मदतीने नैसर्गिक सानिध्यात सोडले. (nandurbar-news-As-many-as-17-snakes-were-given-life-in-forest-aria)

Snake
विधानपरिषद निवडणुक..धुळ्यातून अमरीश पटेलांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब

गेल्या अनेक वर्षापासून या सर्प मित्रांकडून सरपटणाऱ्या जीवजंतूंना जीवदान देण्याचे उत्कृष्ट काम केले जात आहे. सर्पमित्रांद्वारे पकडलेल्या सापांचे वनविभागात नोंद करून वनक्षेत्रपाल प्रशांत हुमणे, वनपाल युवराज भाबड, वनरक्षक दिनेश बागुल यांनी सापांना कोणत्याही प्रकाराची इजा झालेली नसल्याची पडताळणी करून वनक्षेत्रात सुरक्षितपणे सोडले. यावेळी बचाव कार्य करणारे सर्पमित्र विराज भदाणे, प्रतिक कदम, तेजस मालचे, जितेंद्र सांगळे, अजय देवरे, कुणाल भावसार, धिरज कदम आदी उपस्थित होते.

या प्रजातीचे साप सोडले

वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये आढळून आलेल्या विविध प्रजातीचे साप सर्पमित्रांकडून वाचवण्यात आले. यामध्ये अजगर, मांडूळ, घोणस, नाग व इतर प्रजातीचे तब्बल १७ साप वनविभागाच्या मदतीने जंगलात नैसर्गिक सानिध्यात सोडण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com