काश्मीर घाटीतील पंडितांच्या हत्येचा निषेध

काश्मीर घाटीतील पंडितांच्या हत्येचा निषेध
काश्मीर घाटीतील पंडितांच्या हत्येचा निषेध

नंदुरबार : काश्मीर घाटीमध्ये पंडितांच्या हत्येची घटना घडली. या घटनेच्‍या विरोधात नंदुरबारमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्‍यावतीने निषेध आंदोलन केले. तसेच पाकिस्‍तानला सडेतोड उत्‍तर देण्याबाबत निवेदन देण्यात आले. (nandurbar-news-bajarang-dal-Protest-against-the-killing-of-Pandits-in-Kashmir-Valley)

काश्मीर घाटीतील पंडितांच्या हत्येचा निषेध
नंदुरबारमध्‍ये तलाठी संघाने निदर्शने; 13 ऑक्टोबरपासून कामबंदचा इशारा

काश्मीर घाटीत सात भारतीय नागरिकांची केली गेलेली हत्या, तसेच नवरात्रीच्या सुरुवातीलाच झालेल्या शिख महिला शिक्षिकेच्‍या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार शहरातील सुभाष चौक येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांच्यावतीने तीव्र चिंता व आक्रोश व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करून जिहादी आतंकवादाचा पूर्णतः विनाश करण्यासाठी पाकिस्तानला 'न भूतो न भविष्यती' असे उत्तर द्यावे. तसेच हिंदू पंडितांना काश्मीर घाटीत पुनर्स्थापित करून स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था प्रस्थापित करावी; अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली.

Related Stories

No stories found.