Nandurbar Bribe Case: रेशनकार्डसाठी हजार रुपयांची लाच; संगणक चालकासह दोघांविरुध्द गुन्हा

रेशनकार्डसाठी हजार रुपयांची लाच; संगणक चालकासह दोघांविरुध्द गुन्हा
Nandurbar Bribe Case
Nandurbar Bribe CaseSaam tv

सागर निकवाडे

नंदूरबार : नवीन रेशनकार्ड बनविण्यासाठी हजार रुपयांची लाच (Bribe) स्विकारतांना खाजगी लेखनीकाला रंगेहाथ पकडण्यात (Nandurbar) आले असून तहसील कार्यालयातील खाजगी संगणक चालकासह दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Nandurbar Bribe Case
Nana Patole On Akola Clash: 'असा महाराष्ट्र कधीच पहिला नव्हता', अकोला हिंसाचारावरुन नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा

नंदुरबार तालुक्यातील उमर्दे बु. येथील तक्रारदाराने नवीन रेशनकार्ड बनविण्यासाठी अर्ज व कागदपत्र बनविले होते. यावेळी खाजगी इसम वसीम पिंजारी याने माझी तहसील कार्यालयात ओळख असून मी रेशनकार्ड (Ration Card) बनवुन देतो. यासाठी त्याने हजार रुपये लाचेची मागणी केली. वसीम पिंजारी याने स्वतःसाठी ७०० रुपये व संगणक चालक विशाल घुगे याच्यासाठी ३०० रुपये अशी एकुण हजार रुपयांची मागणी केली.

Nandurbar Bribe Case
Police Bharti चा निकाल लागला अन् अख्ख गाव नाच नाच नाचलं, पहिल्यांदाच गावातील युवक बनला पाेलीस

रंगेहाथ पकडले

दरम्यान नंदुरबार तहसिल कार्यालय आवारात हजार रुपयांची लाच घेतांना वसीम बशीर पिंजारी (रा.नंदुरबार) यास रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदाराच्या फिर्यादीवरुन वसीम बशिर पिंजारी, विशाल शिशुपाल घुगे (रा.ठाणेपाडा ता.जि.नंदुरबार) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com