Nandurbar News: आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यानी बनवला बीएस सॅटॅलाइट; भंगार वस्तूंपासून बनविले उपकरण

आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यानी बनवला बीएस सॅटॅलाइट; भंगार वस्तूंपासून बनविले उपकरण
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सोनखांब आश्रम शाळेतील जोसेफ नाईक या विद्यार्थ्याने (Student) आपलं भन्नाट डोकं चालवत भंगारातील (Nandurbar News) टाकाऊ वस्तुपासून बीएस सॅटॅलाइट हे उपकरण तयार केला आहे. नागपूर येथे झालेल्या पन्नासव्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात या उपक्रमाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. (Breaking Marathi News)

Nandurbar News
Kalyan News: पादचारी पुलावर माथेफिरूचे धक्कादायक कृत्य; कल्याण रेल्वे स्टेशनवरील घटनेने तरुणी भेदरली

बीएस सॅटॅलाइट या उपक्रमाच्या उद्दिष्ट सीमा सुरक्षा बळकट करणे. प्रकाश लहरींच्या माध्यमातून सीमा क्षेत्रात पाहिजे त्या स्थळी अचूक कोड प्रोग्रॅम सांख्यिकी मजकूर ऑडिओ व्हिडिओ इमेजेस फाइल्स अशा पद्धतीच्या माहिती पुरवणे आणि स्वयंचलित आधुनिक युद्ध यंत्रे ड्रोन रायफल रणगाडे विमान यांना अचूक संदेश देऊन नियंत्रित करणे. यासोबतच शत्रूंच्या शस्त्रांवर हल्ला करणे तसेच सध्या होत असणाऱ्या डाटा हॅकिंग पासून वाचवणे. आजकाल सीमा क्षेत्रात होत असणाऱ्या घोष खोऱ्यांना थांबवून शत्रूचा हालचालींवर अचूक ठेवून त्या हालचालींचे नेमके स्थळ शोधून काढा त्याची माहिती अचूकपणे मुख्यालयाला माहितीच्या स्वरूपात पोहोचून त्यांच्यावर हल्ला करणे या उपकरणाद्वारे केले जाते. भारतीय जवानांची सैन्यहल्ले टाळून सीमा सुरक्षित आधुनिकता आणण्याचा या एसबी सॅटॅलाइट उपकरण तयार करण्यामागच्या संकल्पना या विद्यार्थ्यांनी मांडले आहे.

Nandurbar News
Beed Accident News: थरकाप उडवणारा अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

विद्यार्थ्याने तयार केलेल्या उपकरणातून युद्धाच्या वेळेस मोबाईलचे सॅटेलाईटने कनेक्ट करून रणगाडे ऑपरेट करता येणार आहेत. त्यामुळे जवानांच्या मृत्यू होणार नाही, तर कमी प्रमाणावर जवान युद्धाच्या वेळेस देखील आपला कर्तव्य बजावू शकतात. तर आकाशातील विरोधी देशांच्या विमानांची देखील ड्रोनद्वारे दिशाभूल करता येणार आहे. विशेष म्हणजे याच्या डेटा लीक होणार नसल्याने विरोधी देशांना आपल्या कुठलाही हालचाली समोरील देशांना समजणार नाही. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या जोसेफ नाईक या विद्यार्थ्यांने तयार केलेल्या या उपक्रमामुळे देशासाठी एक चांगला संदेश जाणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com