
नंदुरबार : अक्कलकुवा शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या दंगलीत मोठ्या प्रमाणावर दगडफेक करून दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले होते. यामुळे शहरात तणाव असून भितीचे वातावरण आहे. पोलिसांचा बंदोबस्त कायम असून वाढीव पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी समाजकंटकांवर कारवाईचे सत्र सुरू ठेवले आहे. शहरातून पोलिसांचे सशस्त्र पथसंचलन करण्यात आले. (nandurbar news calm in Akkalkuwa armed police patroling)
नागरिकांच्या मनातील भिती दूर व्हावी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा; या उद्देशाने नंदुरबार (Nandurbar) जिल्हा पोलीस दलाच्यावतीने शहरात विशेषतः महत्वाचे भागात पोलीसांनी सशस्त्र संचलन केले. सचलनाचे नेतृत्व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले. अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा, तळोदा, मोलगी, विसरवाडी येथील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार तसेच राज्य राखीव पोलीस बलाचे जवान सहभागी झाले होते. एकुण १४ पोलीस अधिकारी यात सहभागी झाले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.