भीषण अपघात! प्रवाशांना घेऊन निघालेली जीप ५० फूट खोल दरीत कोसळली

भीषण अपघात! प्रवाशांना घेऊन निघालेली जीप ५० फूट खोल दरीत कोसळली
Accident
AccidentSaam tv

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोरंबा पाटीलपाडा येथे खराब रस्त्यामुळे एक प्रवासी गाडी उतारावरून घसरून थेट 50 फूट खोल दरीत कोसळल्याने मोठा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला; तर सहाजण जखमी झाले आहे. जखमींना धडगाव ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल केले असून चार जण गंभीर जखमी आहे. सर्व प्रवासी सेगलापाडा येथील रहिवासी होते. (nandurbar news car accident carrying the passengers crashed into a 50 feet deep ravine)

Accident
चुलत भावाच्या उपकाराची परतफेड, विधवा वहिनीसोबत संसार थाटून दिरानं दिला आधार

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या नावाने तयार होणाऱ्या रस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. डोंगरदऱ्यातील चढ- उतार खडतर रस्त्यांमुळे बस सुविधा नाही. या भागातील नागरिकांना खाजगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. वर्षानुवर्षे खराब रस्त्यांमुळे वारंवार दरीमध्ये प्रवासी वाहने पडुन अपघातांचे सत्र सुरूच आहे. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यावर ठोस उपाय योजना करण्यास तयार नाही.

बाजार करून परतताना अपघात

अपघात झालेले सदर वाहन किर्ता कागडा रहासे यांचे असून गोरंबाच्या सेगलापाडा येथील प्रवाशांना शहादा (Shahada) येथे बाजारासाठी घेऊन आले होते. घरी परत जात असताना गोरंबा पाटीलपाडाजवळ हलक्या पावसाच्या सरी कोसळत असताना तीव्र उतारावरून वाहन घसरल्याने थेट 50 फूट खोल दरीत कोसळले. यात मानसिंग वळवी (वय 65) या व्यक्तीचा मृत्‍यू झाला आहे. सदर रस्त्यावर अद्यापही शासनाकडून डांबरीकरण रस्त्याचे काम केलेले नाही. स्थानिक नागरिकांकडून माती टाकून कच्चा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. सदर पाड्याला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम तात्काळ करावी अशी मागणी नागरिकां द्वारे केली जात आहे.

१४ वर्षांपासून दुरूस्‍तीच नाही

ग्रुप ग्रामपंचायत गोरंबा मुख्य पाड्याला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण काम 2008 साली करण्यात आले होते. गेल्या 14 वर्षानंतर या रस्त्यावर कोणतीही दुरुस्ती किंवा नवीन रस्ता तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वारंवार अपघात घडत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com