Nandurbar: अपुऱ्या वर्ग खोल्यांमुळे व्‍हरांड्यात भरताय वर्ग; विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

अपुऱ्या वर्ग खोल्यांमुळे व्‍हरांड्यात भरताय वर्ग; विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून संपूर्ण भारतभर अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्याउलट भारतातील बहुतांश गावात विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण (Education) घेण्याचा अधिकार मिळाला. मात्र ज्या पवित्र ठिकाणी बसून विद्यादान व विद्यार्जन करायचे असते ते विद्यामंदीर मोडक्या तोडक्या अवस्थेत असल्याने खेड्यापाड्यातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण तरी कसे घेता येईल. त्यांच्या प्रगतीवर देशाचं भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे (Nandurbar) खेड्यापाड्यातील शिक्षण दर्जेदार का होऊ शकत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. (Nandurbar ZP School News)

Nandurbar News
Jalgaon: दागिने पॉलिश करण्याचा बहाणा; मंगळसुत्र, सोन्याचे टोंगल केले लंपास

अध्ययन अध्यापनावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटकातून शालेय इमारत, शालेय क्रीडांगण व इतर भौतिक सुविधा यांची नितांत आवश्यकता असते. क्रीडांगण तर सोडाच परंतु अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील बेडाकुंड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना (student) बसायला इमारत नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णता: अंधःकारमय झालेले आहे. शौचालयाला कायमस्वरूपी कुलूप लावलेले आहे. तान्हुल्या चिमुकल्यांना मूलभूत गरजांपासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

व्‍हरांड्यात भरताय वर्ग

बेडाकुंड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पुरेशा वर्गखोल्या अभावी काही वर्ग हे व्हरांड्यात घ्यावे लागण्याची वेळ आली आहे. तसेच तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना कायमच व्हरांड्यातच बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. यामुळे अध्ययन अध्यापनात निरसता व विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा उत्साह नक्कीच कमी होताना दिसत आहे. कधी तरी गरीब कुटुंबात ज्ञानाची ज्योत पेटावी अस वाटत असेल तर शिक्षण विभाग झोपलेल्या अवस्थेतून जागे होणं अत्यंत गरजेचं आहे.

तर शाळेस ठोकणार कुलूप

प्रशासनाने शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE Act)- 2009 च्या निकषाप्रमाणे विचार करून लवकरात लवकर वर्ग खोली मंजूर करून द्यावी. ग्रामस्थांच्‍या सदर मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही; तोपर्यंत शाळेस टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात येईल. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व तरूण मंडळातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. गावातील युवामंचच्यावतीने धिरसिंग वळवी, विक्रम तडवी, राकेश पाडवी सर, रोशन वसावे, दिनेश वळवी, संजय वळवी, संदिप तडवी, इंद्रसिंग तडवी, गणपत वसावे, नितीन वसावे, लालसिंग वळवी आदींनी इशारा दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com