Nandurbar Cold Wave: सातपुडा पर्वतावर दुसऱ्या दिवशीही दवबिंदू गोठले; पारा पाच अंशांपर्यंत घसरला

सातपुडा पर्वतावर दुसऱ्या दिवशीही दवबिंदू गोठले; पारा पाच अंशांपर्यंत घसरला
Nandurbar Cold Wave
Nandurbar Cold WaveSaam tv

नंदुरबार : जिल्‍ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये थंडीची लाट कायम आहे. सातपुड्यातील तापमान ५ अंशाववर खाली आले आहे. तापमानात (Temperature) मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही दवबिंदू गोठल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरात तिसऱ्यांदा थंडीच्या तीव्रतेमुळे असा प्रकार घडला आहे. (Letest Marathi News)

Nandurbar Cold Wave
Mumbai Weather News : मुंबई गारठली, येत्या तीन दिवसांत राज्यातील तापमानात होणार आणखी घट

अक्कलकुवा तालुक्यातील दाब व वालंबा गावाच्या परिसर हा सातपुडा पर्वतापासून खोलगट भागात आहे. या परिसरात नेहमीच थंडीचे प्रमाण अधिक असते. थंडीच्या दिवसात या ठिकाणी दवबिंदू मोठ्या प्रमाणात पडतात. मागे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसामुळे गार वातावरण तयार होऊन या ठिकाणी दवबिंदू गोठले होते. आज पुन्हा सकाळी तसेच चित्र निर्माण झाले होते. सकाळी उठल्यावर थंडीच्या तडाका तीव्र होता.

जमिनीवर पांढरेशुभ्र बर्फाचे कण

गवतावरील दवबिंदू गोठल्यामुळे बर्फाच्छादित पांढरेशुभ्र बर्फाचे कण दिसून आले. थंडीचे प्रमाण शेवटच्या टप्प्यात वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी दवबिंदू गोठल्याच्या घटनेला पुष्टी दिली आहे. येथील तापमान चार ते पाच अंशांवर आले होते. असेच चित्र सकाळी तोरणमाळ परिसरात निर्माण झाले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com