नंदुरबारला नवीन आलेल्या अधिकाऱ्यांचा असाही योगायोग

नंदुरबारला नवीन आलेल्या अधिकाऱ्यांचा असाही योगायोग
नंदुरबारला नवीन आलेल्या अधिकाऱ्यांचा असाही योगायोग

तळोदा (नंदुरबार) : नंदुरबार जिल्ह्यात बदलून आलेल्या नवीन तिन्ही आयएएस अधिकाऱ्यांच्या नावांची आद्याक्षरे सारखीच असल्याचा दुर्मिळ योगायोग घडून आला आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नंदुरबार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तळोदा या तिन्ही पदांवर नवीन आयएएस अधिकारी जिल्ह्याला मिळाले आहेत. या तिन्ही अधिकाऱ्यांची नावे ‘एम’ या आद्याक्षराने सुरू होत आहेत. त्यामुळे ‘एम’ अक्षरानेच सुरू होणाऱ्या मॉन्सून काळात या योगायोगाची एकच चर्चा रंगली आहे. (nandurbar-news-collector-transfer-new-three-officer-join-and-name-coincidant)

नंदुरबारला नवीन आलेल्या अधिकाऱ्यांचा असाही योगायोग
बनावट नोटांचे रावेर कनेक्शन उघड; मोठ्या रॅकेटचा संशय

जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांची पुणे येथे आदिवासी संशोधन संस्थेत आयुक्तपदी बदली झाली आहे, तर नंदुरबारच्या सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी वसुमना पंत व तळोद्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांची यापूर्वीच जिल्ह्यातून बदली झाली होती. या तिन्ही पदांवर नवीन आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बाबतीत हा दुर्मिळ योगायोग घडून आला आहे. त्यात जिल्हाधिकारी म्हणून आयएएस अधिकारी मनीषा खत्री यांची नेमणूक झाली आहे, तर नंदुरबार सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून मीनल करनवाल तसेच तळोद्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून मैनाक घोष यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यात तिन्ही आयएएस अधिकाऱ्यांची नावे ‘एम’ अक्षराने सुरू होत आहेत. त्यामुळे ‘एम’ या अक्षरानेच सुरू होणाऱ्या मॉन्सून काळात हा योगायोग घडून आला आहे. त्यात जिल्ह्यासाठी या तिन्ही आयएएस अधिकाऱ्यांकडून गतिमान व लोकाभिमुख कारभाराची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com