विदेशी मद्यसाठा जप्‍त; महाराष्‍ट्र– गुजरात सीमाभागात कारवाई

विदेशी मद्यसाठा जप्‍त; महाराष्‍ट्र– गुजरात सीमाभागात कारवाई
विदेशी मद्यसाठा जप्‍त; महाराष्‍ट्र– गुजरात सीमाभागात कारवाई
maharashtra gujrat border

नंदुरबार : अवैध गुटखा, दारूची सर्रास वाहतुक होत असताना महाराष्‍ट्र– गुजरात सीमेलगतच्‍या भागात विदेशी मद्याचा साठा जप्‍त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई करत साधारणपणे २६ लाखाच्या विदेशी मद्यासह ३८ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. (nandurbar-news-Confiscation-of-foreign-liquor-Action-in-Maharashtra-Gujarat-border)

maharashtra gujrat border
गुन्हे शाखेच्या तोतया पोलिस..तपासणीच्या नावाखाली हातचलाखी; वृद्ध व्यापाऱ्यास गंडविले

महाराष्ट्र– गुजरात सीमेवरील अक्कलकुवा तालुक्यातील कोराई शिवारात महादेव हॉटेलजवळ गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका कंटेनरमध्ये औषध बॉक्सच्या आड ठेवलेली विदेशी बियरचे ३१५ बॉक्स एकूण २६ लाख ३८ हजार दोनशे रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करून कारवाई केली आहे.

गोवा राज्‍यात निर्मिती

सदर विदेशी मद्य गोवा राज्यात निर्मिती करून विक्रीसाठी परवाना असतांनाही अवैधपणे परराज्यातील विदेशी मद्य वाहतूक करत असताना राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार पथकाने कारवाई करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाहन चालक रामस्वरूप बिस्नोई याला अटक करून आयशर कंटेनरसह एकूण ३८ लाख ४८ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com