महामार्गावरील विसरवाडी येथील बोगदा ऐवजी उड्डाणपूल तयार करण्याची मागणी

महामार्गावरील विसरवाडी येथील बोगदा ऐवजी उड्डाणपूल तयार करण्याची मागणी
महामार्गावरील विसरवाडी येथील बोगदा ऐवजी उड्डाणपूल तयार करण्याची मागणी

नंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील विसरवाडी बसस्थानक जवळील बोगद्याचे काम सुरू होते. परंतु, अडीच वर्षात बोगद्याचे काम अर्धवटच झाले आहे. हा अर्धवट निर्मित बोगदा तोडून उड्डाणपूल बनविण्याची मागणी ग्रामस्‍थांकडून होत आहे.

नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे गेल्या पाच वर्षापासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पहिल्या अडीच वर्षात दिलेल्या कंपनीने अर्धवट काम सोडून पोबारा केल्यानंतर आता पुन्हा जे. एम. म्हात्रे या कंपनीला काम देण्यात आले आहे. पहिल्या अडीच वर्षात सर्वेनुसार अर्धवट केलेल्या कामात विसरवाडी शहरातील बसस्थानकाजवळ अर्धवट तयार केलेला बोगदा तोडून या ठिकाणी नवीन सर्वे करून उड्डाणपुलाची निर्मिती करावी अशी मागणी विसरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच बकाराम गावित व ग्रामस्थांनी केली आहे.

महामार्गावरील विसरवाडी येथील बोगदा ऐवजी उड्डाणपूल तयार करण्याची मागणी
जुगार अड्ड्यावर धाड; १६ जण पोलिसांच्या ताब्यात

रहदारी मोठ्या प्रमाणात

विसरवाडी हे बाजारपेठेचे ठिकाण असून या ठिकाणी जवळपास ४५ पेक्षा अधिक खेड्यांवरून नागरिक येत असतात. तसेच महामार्गाला लागून याआधीच कृषी उत्पन्न बाजार समितीचे शॉपिंग मॉल तयार केलेले आहे. सदर बोगद्यामुळे भविष्यात रहदारीसाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आत्ताच या ठिकाणी बोगदा तोडून उड्डाणपुलाची निर्मिती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबतचे निवेदन नवापूर तहसीलदारांना देऊन मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.