गावकऱ्यांच्‍या मदतीने गायीला जीवदान; पाय घसरून पडली पाचशे मीटर खाली दरीत

गावकऱ्यांच्‍या मदतीने गायीला जीवदान; पाय घसरून पडली पाचशे मीटर खाली दरीत
गावकऱ्यांच्‍या मदतीने गायीला जीवदान; पाय घसरून पडली पाचशे मीटर खाली दरीत
Cow

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील तिनसमाळ येथील शेतकरी गुरे चारण्यासाठी पहाड परिसरात गेला होता. या दरम्‍यान शेतकऱ्याची गाय चरत असताना पाय घसरून पाचशे मीटर खोल दरीत पडली. परंतु, गावकऱ्यांच्या मदतीने गायीला जीवदान देता आले. (nandurbar-news-cow-with-the-help-of-villagers-The-foot-slipped-and-fell-five-hundred-meters-into-the-valley)

सातपुडा दुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील तिनसमाळ गावातील शेतकरी ठोंबा वसावे यांची गाय चरताना पाचशे मीटर खाली दरीत पडली. खोल दरीत पडल्‍याने गाय गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत असलेल्या गाईला तिनसमाळ येथील गावकऱ्यांच्या मदतीने गायला वाचवण्यात यश आले आहे.

झोळीच्‍या सहाय्याने काढले वर

पाचशे मीटर खोल दरीत पडलेल्या गाईला गावकऱ्यांनी झोळीच्या साह्याने मोठ्या परिश्रमाने वर काढली. शेतकरी ठोंबा वसावे हे गाई चारायला गेले असतांना हलक्या स्वरूपाच्या झालेल्या पावसामुळे गाईचा पाय घसरून पाचशे मीटर खोल दरीत पडली होती.

Cow
मुसळधार पावसाने धुळेही जलमय; घरांमध्ये साचले गुडघाभर पाणी

गावात मुलभूत सुविधाही नाही

तिनसमाळ हे गाव सातपुड्यातील उंच डोंगरांवर वसलेले असून या गावातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथील आजारी नागरिक व सर्पदंश आणि मोठी दुर्घटना झाल्यास येथील नागरिकांना प्रशासनाची मदत वेळेवर पोहोचत नसून नरक यातना सहन कराव्या लागतात. त्यामुळे प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com