त्‍या महिलेची हत्‍या प्रेमसंबंधातून..शंभराहून अधिक फुटेज तपासत धागे उलगडले

त्‍या महिलेची हत्‍या प्रेमसंबंधातून..शंभराहून अधिक फुटेज तपासत धागे उलगडले
त्‍या महिलेची हत्‍या प्रेमसंबंधातून..शंभराहून अधिक फुटेज तपासत धागे उलगडले
Nandurbar police

नंदुरबार : नंदुरबारमध्‍ये दहा दिवसांपुर्वी महिलेचा खुन झाला होता. २६ ऑगस्टला महिलेची झालेली हत्येची गुत्थी उलगडण्यात पोलीसांना यश आले आहे. प्रेमसंबंधातून महिलेची हत्‍या झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले असून, सीसीटीव्‍ही फुटेजद्वारा सुरत शहरातून आरोपीला अटक केली. (nandurbar-news-crime-news-love-matter-women-murder-case-police-solve-and-parson-arrested)

नंदुरबारमध्ये २६ ऑगस्टला महिलेची झालेली हत्येची गुत्थी उलगडण्यात पोलीसांना यश आले आहे. मयत महिलेचे नाव सीता नंदकुमार भगत असुन ती छपरा (बिहार) मधील रहिवाशी आहे. सुरतमधल्या एका कारखान्यामध्ये नोकरी करणाऱ्या विनयकुमार राजनम राय ह्याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते.

त्‍याचा पहिला विवाह आला समोर अन्‌

आरोपी विनयकुमार राय हा स्वःत विवाहीत असुन त्याला तीन मुले देखील होती. यानंतर देखील त्‍याने महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवले होते. पहिल्‍या विवाहाबाबत मयत महिलेला समजल्यानंतर त्याच्यात वाद झाले. यानंतर आरोपीने सीता भगतच्या खुणाचा कट रचुन तिला नंदुरबार मधल्या नारायणपुर रस्त्यालगतच्या रेल्वे रुळाजवळ आणत तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन तिची हत्या केली.

Nandurbar police
नाल्‍याच्‍या प्रवाहात दोघे मित्र गेले वाहून; एकाचा मृतदेह सापडेना

२१ रेल्‍वेस्‍थानक व शंभर सीसीटीव्‍ही फुटेज

अतिशय आव्हानात्मक तपास असलेल्या या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने रेल्वे स्थानकासह अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सरते शेवटी पाचोराबारी रेल्वे स्टेशन लगतच्या एका घरातील सीसीटीव्ही फुटेजने काही तपास लागला. यानंतर तब्बल २१ रेल्वे स्थानक आणि सुरतमधील शंभरहुन अधिक ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासणीनंतर अतिशय क्लिष्ट गुन्हाचा छडा लावण्यात नंदुरबार पोलीसांना यश आले आहे. यानंतर पोलीसांनी आरोपीला सुरतहून अटक केली. या संपुर्ण तपासातील ६ पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी पाच हजारांचे बक्षीस देवुन पोलीस खात्यामार्फत गौरव करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com