शहादा तालुक्यात पावसामुळे मिरची, पपई, ऊसाचे नुकसान

शहादा तालुक्यात पावसामुळे मिरची, पपई, ऊसाचे नुकसान
शहादा तालुक्यात पावसामुळे मिरची, पपई, ऊसाचे नुकसान
मिरची

नंदुरबार : शहादा तालुक्यात मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला. अनेक नदी-नाल्यांना प्रथमच पाणी आले. या धुवाधार पावसामुळे ऊस, पपई, केळी, मिरची या पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. (nandurbar-news-Damage-to-chilli-papaya-and-sugarcane-due-to-rains-in-Shahada-taluka)

जिल्ह्यातील शहादा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मिरची, पपई, ऊस केळी पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीपासूनच पर्जन्यमानाचे प्रमाण कमी झाल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा होती. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या मिरची पिकासह पपई, ऊस पीक भुईसपाट झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

मिरची
ह्रदयद्रावक..आईची मुलासह विहिरीत उडी घेत आत्‍महत्‍या

शेतकरी आर्थिक संकटात

मोठ्या मेहनतीने पिकांची लागवड करून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना नगदी पिके भुईसपाट झाल्याने औषध फवारणी व इतर खर्च ही निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com