नंदुरबारमध्‍ये दरेकरांच्‍या राजीनाम्‍याची मागणी; राष्‍ट्रवादीतर्फे आंदोलन

नंदुरबारमध्‍ये दरेकरांच्‍या राजीनाम्‍याची मागणी; राष्‍ट्रवादीतर्फे आंदोलन
नंदुरबारमध्‍ये दरेकरांच्‍या राजीनाम्‍याची मागणी; राष्‍ट्रवादीतर्फे आंदोलन

नंदुरबार : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरल्याच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्‍यावतीने आंदोलन करण्यात आले. (Demand for resignation of everyone in Nandurbar; Movement on behalf of the Nationalists)

भाजप नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीला रंगलेल्या गालाचे मुके घेण्याची सवय आहे; असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडी व शहर शाखेच्या वतीने नंदुरबार शहरातील अंधारे चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवीण दरेकर यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

नंदुरबारमध्‍ये दरेकरांच्‍या राजीनाम्‍याची मागणी; राष्‍ट्रवादीतर्फे आंदोलन
दरेकरांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध; राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे प्रतिमेस जोडे मारो

आमदारकीचा राजीनामा द्यावा

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन जगताप यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदावर बसलेल्या व्यक्तीला महिलांबद्दल अपशब्द काढणे शोभत नाही. प्रवीण दरेकर यांनी तात्काळ त्यांच्या आमदारकीच्या राजीनामा द्यायला पाहिजे. आंदोलनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com