Nandurbar: युवासेनेची थाळी वाजवून निदर्शने

युवासेनेची थाळी वाजवून निदर्शने
Nandurbar
NandurbarSaam tv

नंदुरबार : वाढती महागाई विरोधात आज शिवसेनेच्यावतीने धडगावमध्ये थाळी बजाव आंदोलन करण्यात आले आहे. शिवसेनेच्यावतीने बाजार पेठेतील मुख्य रस्त्यावर जोरदार थाळी वाजवुन निदर्शने करण्यात आली आहे. (nandurbar news Demonstrations by playing Yuvasena plate)

Nandurbar
युवासेनेने थाळ्या वाजवत वेधले लक्ष; महागाई, इंधन दरवाढीचा निषेध

वाढती महागाई आटोक्यात आणण्यात केंद्र सरकार कुचकामी ठरत असल्याचा आरोप करत शिवसेनेने केंद्राच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. दुसरीकडे नंदुरबार (Nandurbar) शहरात देखील शिवसैनिकांनी (Shiv Sena) अंधारे चौकात आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

थाळी वाजविण्यास मज्‍जाव

महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगाचे परिक्षा केंद्र जवळच असल्याने यावेळी मात्र शिवसैनिकांना थाळी वाजविण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे फक्त घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी याठिकाणी केंद्राच्या विरोधात निषेध आंदोलन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com