पोलिसांनी पचविली शंभर बॉक्‍स दारू?; भ्रष्‍ट्राचाराचा आरोप, ऑडिओ क्लिप व्हायरल

पोलिसांनी पचविली शंभर बॉक्‍स दारू?; भ्रष्‍ट्राचाराचा आरोप, ऑडिओ क्लिप व्हायरल
पोलिसांनी पचविली शंभर बॉक्‍स दारू?; भ्रष्‍ट्राचाराचा आरोप, ऑडिओ क्लिप व्हायरल

नंदुरबार : मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या धडगाव तालुक्यातुन मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची तस्करी केली जाते. अशातच अवैध दारूची तस्‍करी होत असलेल्‍या वाहनावर कारवाई पोलिसांनी केली. परंतु, या कारवाईत पोलिसांनी भ्रष्‍ट्राचार केल्‍याचा आरोप केला जात असून दोनशे बॉक्‍स असताना केवळ शंभर बॉक्‍स असल्‍याची नोंद एफआयआरमध्‍ये केली आहे. (nandurbar-news-dhadgaon-police-confiscated-a-hundred-boxes-of-liquor-Allegations-of-corruption-audio-clip-goes-viral)

मध्‍यप्रदेश व गुजरात या दोन राज्‍याच्‍या सिमेवर असलेल्‍या धडगाव या आदीवासी परिसरातून अवैध दारूची तस्‍करी होत असते. या अवैध दारू वाहतुकीला पोलिसांचे पाठबळ असल्‍याचे देखील बोलले जात असून, पोलिसांमुळेच दारूची तस्‍करी सुरू आहे. याच दरम्‍यान अवैध दारूची तस्‍करी होत असताना पोलिसांकडून गाडी पकडण्यात आली होती. या गाडी दोनशे दारूचे बॉक्‍स होते. मात्र पोलिसांनी ते शंभर असल्‍याचे नोंद करत धडगाव पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे.

ती ऑडिओ क्लिप व्हायरल

धडगाव पोलिसांनी केलेल्‍या कारवाईतील सदर वाहनात २०० पेटी माल असतानाही एफआयआरमध्ये फक्त १०० पेटीची नोंद केली आहे. एफआयआरमध्ये फक्त शंभर पेटी ९ लाख रुपये किंमतीचा दारु व वाहन १३ लाख असा एकूण २२ लाख मुद्देमाल जप्तची माहिती आहे. परंतु वायरल ऑडिओ क्लिप वरून गाडीत २०० बॉक्स दारू असल्याचे स्पष्ट होत आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी दारु मालक व पोलिसांमध्ये एफआयआर कशी नोंदवायची, कोणावर गुन्हा दाखल करायचा, तसेच २०० पेटी मालमधील १०० पेटी परत करा, शंभर पेटीच्या मालावर कारवाई करा अशी वार्तालाप करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे खरच पोलिसांनी शंभर बॉक्‍स दारू पचविली का? हे सिद्ध होणे बाकी आहे.

पोलिसांनी पचविली शंभर बॉक्‍स दारू?; भ्रष्‍ट्राचाराचा आरोप, ऑडिओ क्लिप व्हायरल
मुलाच्‍या मृत्‍यूचे दुःख..पार्थिव नेण्यासाठी पित्याला मागावी लागली भिक्षा

पोलिसांचा दुजोरा अन्‌ टाळाटाळही

सदर व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये गुन्हा करणारा व्यक्ती पोलिसांना सूचना देत आहे की; एफआयआर कशी व कोणावर करावी. त्याला पोलीसही दुजोरा देत आहे. सदर ऑडिओ क्लिपमध्ये धडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र काशिनाथ चोरमाले यांचा आवाज असून त्यांनी गुन्हा नोंद करण्याआधी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमा बरोबर वार्तालाप केला असल्याचे बोलले जात आहे. सदर कारवाई व वायरल ऑडिओ क्लिपबाबत धडगाव पोलीस स्टेशन माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com