सातपुड्यातील रानमेवाची आवक वाढली; व्यापारी धड़गावात

सातपुड्यातील रानमेवाची आवक वाढली; व्यापारी धड़गावात
सातपुड्यातील रानमेवाची आवक वाढली; व्यापारी धड़गावात

नंदुरबार : धडगाव सातपुड्यातील रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीताफळांची आवक वाढली आहे. मध्य प्रदेश व गुजरात येथील व्यापारी रानमेवा खरेदीसाठी धडगावात दाखल झाले आहे. (nandurbar-news-dhadgaon-satpuda-ranmeva-seetafad-market-gujrat-and-madhya-pradesh)

सातपुड्याच्या डोंगरदऱ्यात नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या सीताफळाची यंदा उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिकरित्या उत्पादित झालेल्या सीताफळांची सातपुड्यातील रानमेवा म्हणून प्रसिद्धी आहे. यंदा अतिवृष्टी व वादळी वारा कमी झाल्याने फळधारणा चांगली झाली आहे, तसेच फळ गळती थांबल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.

दीडशे- दोनशे रुपये टोपली

सध्या धडगाव बाजारपेठेत सीताफळांची आवक वाढली असून दीडशे ते दोनशे रुपये टोपली विक्री होत आहे. सातपुड्यातील रानमेवा खरेदीसाठी गुजरात, मध्यप्रदेश येथील व्यापारी धडगावात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून सिताफळांची टोपली पद्धतीने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे धडगाव येथे सिताफळ विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध व्हावी; जेणेकरून वजनाने व लिलावाद्वारे विक्री होऊन शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळेल अशी व्यवस्था शासनाने व लोकप्रतिनिधींनी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.