नंदुरबार- धुळे संयुक्त जिल्हा बँक निवडणूकीसाठी आज मतदान

नंदुरबार- धुळे संयुक्त जिल्हा बँक निवडणूकीसाठी आज मतदान
नंदुरबार- धुळे संयुक्त जिल्हा बँक निवडणूकीसाठी आज मतदान

नंदुरबार : नंदुरबार- धुळे संयुक्त जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया होत आहे. १७ जागांपैकी ७ जागा आधीच बिनविरोध झाल्या असून १० जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी आज मतदान प्रक्रिया होत आहे. (Nandurbar-news-dhule-nandurbar-district-bank-election-today-votin)

नंदुरबार- धुळे संयुक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असून आज सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजता दरम्यान मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एकूण ८ केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया घेण्यात येत आहे. शहादा, नंदुरबार तालुक्यात प्रत्येकी २ केंद्र तर नवापूर, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव येथे प्रत्येकी १ केंद्र असे एकूण ८ केंद्रांवर मतदान प्रक्रिया सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सर्वसमावेशक शेतकरी विकास पॅनल व विरोधकांमध्ये समोरासमोर लढत होणार आहे.

नंदुरबार वि. का. सोसायटी मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी आणि पावबा माधवराव धनगर यांच्यात लढत आहे. या गटात ६९ मतदार आहेत. अक्राणी महल वि. का. सोसायटीच्या जागेसाठी संदीप मोहन वळवी व विलास पुनाजी पाडवी यांच्यात लढत असून १६ मतदार आहे.

नवापूर वि. का. सोसायटीच्या जागेसाठी अभिमन फुलसिंग वसावे विरुद्ध अमरसिंग हुरजी गावित यांच्यात लढत होत असून, १७ मतदार आहेत. विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गीय जागेसाठी दर्यावगीर दौलतगीर महंत विरुद्ध सुरेश फकिरा शिंत्रे यांच्यात लढत आहे. कृषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्थेच्या जागेसाठी शेतकरी विकास पॅनलतर्फे विद्यमान चेअरमन राजवर्धन कदमबांडे विरुद्ध अंकुश विक्रम पाटील यांच्यात लढत आहे. जिल्हा बँकेच्या मतदान प्रक्रिये साठी पोलीस दलाच्या वतीने आठ केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com