नंदुरबार : शहादा शहराला लागून असलेल्या मोहम्मद पोल्ट्रीलगत नगरपालिकेच्या कचरा डेपोजवळ अनरद ए. जी. येथे वीज वितरण कंपनीचा इलेक्ट्रिक पोलवर काम करीत होता. मेन लाईनची वायर चालू लाईनला लागल्याने खाजगी कर्मचाऱ्याच्या शॉक लागून (Death) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Nandurbar news dies of shock while working on electricity pole)
कर्मचारी काम करीत असताना त्याच्याजवळ कोणीही वायरमन किंवा इतर कर्मचारी उपस्थित नव्हता. याप्रकरणी नातेवाईक आणि समाजबांधवांनी महावितरण (MSEDCL) कार्यालयावर धडक दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुमारे चार तासांनंतर मयत दीपक पाटील यांचा मृतदेह म्हसावद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी वेळीच जमावावर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला.
विजेच्या खांबाच्या बाजूला असलेल्या मेन लाईनच्या तारेला स्पर्श झाल्याने वर्डे टेंबा येथील ३२ वर्षीय दीपक पाटील या खाजगी कर्मचाऱ्याच्या विजेचा धक्का लागला. त्यात तो खांबावरून खाली कोसळल्याने जखमी झाला. विजेचा धक्का लागून खाली पडल्यावर दोन तास युवक घटनास्थळावर जखमी अवस्थेत पडून होता. त्याला एका व्यक्तीने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती नातेवाईक व गावकऱ्यांना मिळाल्याने ते शहादा महावितरण विभागाच्या कार्यालयावर धडकले. शेकडोच्या संख्येने जमाव असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी महेश घोगरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भूषण जगताप, तिरुपती पाटील, साहाय्यक अभियंता सुजित पाटील आणि पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. याबाबत चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.