Saam Impact: गोरंबा पाणीटंचाई..जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतीत तीन विहिरींचे काम सुरू

गोरंबा पाणीटंचाई..जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतीत तीन विहिरींचे काम सुरू
Saam Impact: गोरंबा पाणीटंचाई..जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतीत तीन विहिरींचे काम सुरू
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : राज्यातल्या काही भागात मान्सुनचे आगमण झाल्याने दिलासा मिळाला असला तरी, अद्यापही काही भागात पाण्याची भयावह टंचाई जाणवत आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या गोंरबा ग्रामपंचायतीमधील (Gram Panchayat) पाण्याच्या दुर्भिषाची अशुच काहीसी भयावह परिस्थीती समोर आली आहे. तीव्र पाणीटंचाईबाबत ‘साम टीव्ही’ने बातमी प्रसारित केल्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषद (Nandurbar ZP) प्रशासनाने याची दखल घेतली आहे. येथे तीन विहिरींच्या कामाला सुरुवात केली आहे. (nandurbar news District administration starts work of three wells in Goramba gram Panchayat)

विहिरींना पर्याप्त पाणी नसल्याने पाण्याच्या एक एक थेंबासाठी या गावच्या चिमुकलींना जीवघेणी कसरत करुन विहीरीत चढावे आणि उतरावे लागत असुन विहारीतील एका झऱयातुन मग्याने पाणी गोळा करुन बादलीत भरण्याची परिस्थीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे याठिकाणी प्रशासनाने विहीरींचे काम हाती घेतले असले तरी या सर्व पाणी प्रश्नांवर कायम स्वरूपी ठोस उपाय योजना करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी पाड्यांवर योजनेसाठी उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने या गावातील महिला आणि चिमुकल्याचा जीव पाण्यासाठी धोक्यात घालावा लागत असल्याच भीषण वास्तव समोर आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com