मद्यपी वाहन चालकाविरुध्द धडक मोहीम; ५९ गुन्हे दाखल

मद्यपी वाहन चालकाविरुध्द धडक मोहीम; ५९ गुन्हे दाखल
मद्यपी वाहन चालकाविरुध्द धडक मोहीम; ५९ गुन्हे दाखल
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत एकुण २० टिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान एकुण ५५२ चारचाकी व दुचाकी मोटरसायकल चालकांची तपासणी केली असता त्यात ५९ वाहन चालकांनी (Nandurbar News) मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळुन आले. त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल केले आहेत. (nandurbar news drunk and drive 59 cases filed)

Nandurbar News
झोक्‍यात तीनही बहिणी खेळत होत्‍या अन्‌ क्षणार्धात होत्‍याचे नव्‍हते झाले

नाशिक (Nashik) परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी रस्ते अपघाताच्या (Accident) गुन्ह्यांचा आढावा घेतला असता बरेचशे गुन्हे हे वाहन चालकाच्या चुकीमुळे विशेषत: मद्यप्राशन करुन वाहन चालविल्यामुळे झाले असल्याचे आढळून आले. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबत संपूर्ण नाशिक परिक्षेत्रातील (Police) पोलीस अधीक्षक यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली असून कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

असे झाले गुन्‍हे दाखल

त्यांचे विरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे १०, उपनगर पोलीस ठाणे येथे-०४, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे-०४, नवापुर पोलीस ठाणे येथे ११, विसरवाडी पोलीस ठाणे येथे-०६, शहादा पोलीस ठाणे येथे-०४, धडगांव पोलीस ठाणे येथे १०३, म्हसावद, सारंगखेडा, अक्कलकुवा, तळोदा पोलीस ठाणे येथे प्रत्येकी ०२ गुन्हे, मोलगी पोलीस ठाणे येथे -०३, शहर वाहतुक शाखेमार्फत ०६ गुन्हे असे एकुण ५९ गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

परवाने निलंबनाची कारवाई

दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात येणार असुन लवकरच त्यांचेवर परवाने (लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्यात येईल. नाकाबंदीसाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार सचिन हिरे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे आदींचा सहभाग होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com