
सागर निकवाडे
नंदूरबार : संस्थात्मक आणि सुरक्षित प्रसृतीसाठी जिल्ह्यात शासनाने कितीही प्रयत्न सुरू केले असले तरी कुपोषणाचे प्रमाण अधिक असलेल्या (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात घरीच होणाऱ्या असुरक्षित प्रसृतीचे प्रमाण आधिक आहे. राज्यात हे प्रमाण ०.४१ टक्के असताना नंदुरबार जिल्ह्यात हे प्रमाण ८.३६ टक्के इतके आहे. हे राज्यातील सर्वात जास्त आहे. बाल आणि माता मृत्यू साथी चिंतेचा विषय आहे. जिल्ह्यात (Malnutrition) या वर्षी २ हजार ८७७ प्रसृती घरी म्हणजे असुरक्षित झाल्या आहेत. हा शासकीय आकडा असला तरी प्रत्यक्षात दुर्गम परिस्थिती वेगळी असल्याचा दावा सामाजिक संस्थांनी केला आहे. (Latest Marathi News)
नंदुरबार जिल्हा सातपुड्याच्या दुर्गम भागात असून या ठिकाणी असलेले कुपोषण, बाल आणि मातामृत्यू असताना घरी होणाऱ्या असुरक्षित प्रसृती चिंतेचा विषय ठरला आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या काळात ३४ हजार ४३२ प्रसृती झाल्या आहेत. त्यापैकी त्यात संस्थांत्मक अर्थात सुरक्षित प्रसृती ३१ हजार ५५५ आहे. तर घरी होणाऱ्या असुरक्षित प्रसृतीची संख्या मोठी असून ती तब्बल २ हजार ८७७ इतकी आहे. असुरक्षित होणाऱ्या प्रसृतीमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा राज्यात पहिला क्रमांक लागला आहे.
नंदुरबार सातपुड्याचा दुर्गम भागात असलेला जिल्हा आहे. अनेक भागात दळणवळणाचा साधनाचा अभाव आहे. दुर्गम भागात आसलेल्या आरोग्य सेवांमधील वाढलेल्या रिक्त पदांची संख्या आहे. दरम्यान असुरक्षित प्रसृतीचे प्रमाण वाढलेल्या नंदुरबार, अमरावती, गडचिरोली आणि पालघर जिल्ह्यासाठी राज्याचा अतिरिक्त आरोग्य संचालकांनी नोटीस पाठवून खबरदारीच्या एसआरव्ही उपाय योजना करण्याचे दिले आहेत. त्यात आशा आणि आरोग्य यंत्रणा यांनी गर्भवती मातांच्या घरी दर महिन्याला भेटी द्याव्यात. त्याचसोबत जनजागृती करावी जिल्हास्तरीय आधिकाऱ्यांनी या संदर्भात आढावा घ्यावा; असे आदेश दिले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.