अतिदुर्गम भागातील गांजा शेतीचा पर्दाफास; साडेचार लाखाचा गांजा जप्त

अतिदुर्गम भागातील गांजा शेतीचा पर्दाफास; साडेचार लाखाचा गांजा जप्त
गांजा
गांजा

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील अतिदर्गम भागातील कंज्यापाणी गांवाचा शिवारात ज्वारीच्या शेतात अवैधरित्या गांजा लागवड करून शेती करणाऱ्या एकाचा पर्दाफास करण्यात आला. त्याचा शेतातील साडेचार लाखाचा ओला गांजा पोलिसांनी कापणी करून जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा पथकाने केली आहे. अतिदुर्गम भागातील पहिलीच धाडसी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. अन्यथा या परिसरात पोलिसांना पोहोचणे जिकरिचे मानले जाते. (nandurbar-news-Exposure-to-cannabis-cultivation-in-remote-areas-Four-and-a-half-lakh-cannabis-seized)

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक यांचा आदेशान्वये विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचा मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी अवैध व्यवसायांविरूध्द कारवाईचा धडाका सुरू केला आहे. धडगांव तालुक्यात कंज्यापाणी गांव शिवारात शिलदार फाड्या पावरा याने त्याचे ज्वारी पिकाचे शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली असल्याची माहिती मिळाली होती.

ज्वारीचे शेतात संशयास्पद हालचाली

त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी एक पथक तयार केले. तसेच धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे व त्यांचे कर्मचारींसह कंज्यापाणी गावाजवळील डोंगराळ भागात पायी गेले. त्यावेळी एकजण ज्वारीचे शेतात संशयास्पद हालचाली करतांना दिसुन आले. त्यास ताब्यात घेवुन शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिकठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे आढळले.

गांजा
महामार्गावर फलक सरकारचे; मालकी मात्र आमदारांची

अडीच हेक्टर क्षेत्र पाहणी

पथकाने सुमारे अडीच हेक्टर क्षेत्र पिंजुन काढले. तेथे ४ लाख ५३ हजार ३२० रुपये किंमतीची एकुण १२७ गांजाची झाडे मिळुन आली. संशयीत शिलदार फाड्या पावरा (वय ५५, रा. कंज्यापाणी पोस्ट काकडदा) यास सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेण्यात आले. त्यांचेविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये धडगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पथकात पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, धडगांवचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, स्थानिक गुन्हे शाखेचे असई अनिल गोसावी, हवालदार दिपक गोरे, रविंद्र पाडवी, मुकेश तावडे, पोलीस नाईक- गोपाल चौधरी, जितेंद्र अहिरराव, सुनिल पाडवी, बापु बागुल, मनोज नाईक, मोहन ढमढेरे, रमेश साळुके, अविनाश चव्हाण, पोलीस अमंलदार विजय ढिवरे, अभिमन्यु गावीत, दिनेश लाडकर, संजय रामोळे, चेतन चौधरी, धडगांव पोलीस ठाण्याचे राजेंद्र जाधव, राजेश्वर भुसलवाड, विनोद पाटील यांचा समावेश होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com