पोलिस अधिक्षक पंडित यांच्‍या पुष्‍पवृष्‍टी करून निरोप; मुंबई येथे बदलीने सोडला पदभार

पोलिस अधिक्षक पंडित यांच्‍या पुष्‍पवृष्‍टी करून निरोप; मुंबई येथे बदलीने सोडला पदभार
पंडित
पंडित

नंदुरबार : गेल्या दोन वर्षात नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांची बदली झाली. यामुळे त्‍यांना आज निरोप देण्यात आला. पंडित यांना निरोप देताना कर्मचारी भावनिक झाले होते. (nandurbar-news-Farewell-to-Superintendent-of-Police-Pandit-He-was-transferred-to-Mumbai)

गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचा चेहरामोहरा बदलणारे उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मुंबई शहर येथे उपायुक्त पदी बदली झाल्यानंतर आज त्यांना जिल्हा पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने समारोप कार्यक्रमाचे आयोजन करून निरोप दिला. यावेळी पोलीस दलातर्फे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून अखेरचा निरोप देण्यात आला.

पंडित
पूर्वसूचना न देता वन विभागाद्वारे पिकाची नासाडी..तीन एकर मका कापून फेकला

दंगलीचे प्रमाण शून्यावर

गेल्या ४० वर्षांपासून नंदुरबार शहरात सण उत्सवात काळात दंगली घडवून आणण्याचे प्रकार होत होते. परंतु गेल्या दोन वर्षात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या कार्यकाळात दंगली होणाऱ्या परिसरात विशिष्ट उपाय योजना करून अंमलबजावणी केल्याने दंगलींचे प्रमाण शून्यावर आणले. पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणे. तसेच सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी केलेले प्रयत्न कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी व पोलिस स्टेशनच्या नवीन इमारती बांधणे. तसेच नवीन गाड्या उपलब्ध करून देणे असे कित्येक काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पार पाडले.

कर्मचाऱ्यांमध्ये शिस्‍त

विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये लावलेल्या शिस्तीसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित लोकप्रिय ठरले. त्यांच्या शिस्तप्रिय धोरणांमुळे कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय कमी झाले होते. शहरातील अवैध धंदे तसेच कोणताही गुन्हा घडल्यास त्याची तत्काळ कारवाई करून आरोपींवर योग्य ती कारवाई करणे अशा अनेक महत्त्वाच्या कामगिरीसाठी त्यांचा कार्यकाळ अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com