शाळेचा पहिला दिवस; विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करत स्वागत, पाठ्यपुस्तकांचे वाटप

शाळेचा पहिला दिवस; विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करत स्वागत, पाठ्यपुस्तकांचे वाटप
शाळेचा पहिला दिवस; विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करत स्वागत, पाठ्यपुस्तकांचे वाटप
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील प्राथमिक माध्यमिक शाळा शासनाच्या निर्देशानुसार आज सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळा प्रवेशाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) शिक्षण अधिकाऱयांनी नंदुरबारमधल्या (Nandurbar News) उमर्दे खुर्द गावात विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करुन स्वागत केले. यावेळी ढोल ताशे आणि लेझीमच्या पथकावर मीकी माऊसच्या सानिध्यात मुलांची गावातुन मिरवणुक काढण्यात आली. शाळा प्रवेशद्वारावर मुलांचे औषण करुन त्याच्या शाळा प्रवेशाचा केक देखील कापण्यात आला. (nandurbar news First day of school Welcome by showering flowers on students)

Nandurbar News
शेतात नांगरणी करतांना शेतकऱ्याचा करंट लागून मृत्यू

आदिवासी विकास विभागा अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम (School) शाळा, अनुदानित आश्रम शाळांमध्ये देखील शासनाच्या जीआरनुसार प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नंदुरबार शहरातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या इंग्लिश मिडीयम शाळेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून पहिल्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी जे विद्यार्थी शाळेत आले नाहीत, त्यांनी शाळेत लवकरात लवकर हजर व्हावे; असे आवाहन शाळा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यातील 1 हजार 755 शाळांमध्ये पहिले ते आठवीचे जवळपास 2 लाख 31 हजार 364 विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशित करण्यात आले आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण व्हावे या उद्देशाने 2017 पासून महाराष्ट्र शासनाने प्रवेश उत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात शाळा प्रशासनाच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com