पुढल्‍या वर्षी लवकर या..पाच दिवसांच्‍या गणरायाला निरोप

पुढल्‍या वर्षी लवकर या..पाच दिवसांच्‍या गणरायाला निरोप
पुढल्‍या वर्षी लवकर या..पाच दिवसांच्‍या गणरायाला निरोप

नंदुरबार : शहरातील पाच दिवसाच्या घरगुती गणपती बाप्पाला भाविकांनी ‘गणपती बाप्‍पा मोरया..पुढल्‍या वर्षी लवकर या..’ असे म्‍हणत भावपुर्ण निरोप दिला. शहरातील अनेक भाविकांकडून शिवन नदीत बाप्पाचे विसर्जन केले. (nandurbar-news-five-day-ganesh-visrjan-shivan-river)

नंदुरबार जिल्ह्यात पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना विसर्जनासाठी शहादा, नवापूर, नंदुरबार नगरपरिषदेद्वारे सार्वजनिक गणेश मंडळांसाठी कृत्रिम तलावाचे नियोजन करून विसर्जनासाठी सुविधा करण्यात आली होती. तर नंदुरबार शहरातील घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांनी शिवन नदीत गणपती बाप्पाला विधिवत पूजाअर्चा करून विसर्जित केले. शिवन नदी परिसरात पोलिसांच्या बंदोबस्तात नागरिकांनी आपल्या गणपती बापाला आनंद उल्हासात निरोप दिला.

पुढल्‍या वर्षी लवकर या..पाच दिवसांच्‍या गणरायाला निरोप
धुळ्यात दरेकरांच्‍या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध; शेण चोपडून जाळली प्रतिमा

कोरोनाचे संकट टळू दे..

यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने उत्सव साजरा करण्यात भाविकांना थोड्या प्रमाणात शिथिलता मिळाल्याने उत्साह द्विगुणित झाला आहे. पुढच्या वर्षी संपूर्ण जग पूर्णपणे कोरोनामुक्त व्हावे; अशी प्रार्थना भाविकांनी यावेळी करून गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर यावे असे सांगत जल्लोश केला. ढोल-ताशांचा गजरात मिरवणूका न काढता अगदी साध्या पद्धतीने पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला भाविकांनी शिवन नदीत निरोप दिला. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने नदी-नाल्यांना पूरजन्य परिस्थिती नसल्यामुळे भाविकांनी शिवन नदी परिसरात गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देखील करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com