दुमजली इमारतीवरून पाय घसरला; मजूर महिलेचा मृत्‍यू

दुमजली इमारतीवरून पाय घसरला; मजूर महिलेचा मृत्‍यू
दुमजली इमारतीवरून पाय घसरला; मजूर महिलेचा मृत्‍यू
Contraction labor

नंदुरबार : नवापूर (Navapur) शहरात नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गवंडीसोबत काम करताना दुमजली इमारतीवरून महिला मजुराचा पाय घसरून ती खाली पडली. यात त्‍या महिलेचा मृत्यू झाल्‍याची घटना आज दुपारी घडली.

Contraction labor
प्रवासी वाहतुकीवरून मारहाण; खासगी बस वाहकाचा मृत्यू

नवापूर शहरातील तलाठी कार्यालय जवळ न्यायप्रविष्ट असलेल्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना उर्मिला दिलीप गावित या मजूर महिलेचा दुसऱ्या मजल्यावर काम करत असताना पाय घसरला. यात ती महिला थेट खाली पडली. यात तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

महिलेची किंचाळी व पडल्‍याचा जोरदार आवाज

मजूर महिला खाली कोसळल्यावर मोठा आवाज झाल्याने जवळील बांधकामावरील अन्‍य मजूर व जवळील नागरीक जमा झाले. यावेळी दुकान मालक राहुल मराठे यांनी एका बाईकस्वाराच्या मदतीने महिलेला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तत्काळ दाखल केले. परंतु उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी कळविले आहे. याबाबत नवापूर पोलीस अधिक तपास करत आहे.

सुरक्षेचे उपकरण नाही

सदर बांधकामाच्या ठिकाणी गवंडीसोबत काम करणाऱ्या मजुरांना ठेकेदाराकडून कोणतेही सुरक्षेचे उपकरणे दिली गेले नसल्याचे समोर आले आहे. सदर महिलेच्या घटनांमुळे बांधकाम मजुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वादग्रस्त व न्यायप्रविष्ट असलेल्या इमारतीच्या बांधकाम करणारे मालक व ठेकेदारावर नवापुर नगरपरिषदेने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com