विदेशी मद्यसाठा जप्‍त; अवैध सुरू होती वाहतुक
मद्यसाठा

विदेशी मद्यसाठा जप्‍त; अवैध सुरू होती वाहतुक

विदेशी मद्यसाठा जप्‍त; अवैध सुरू होती वाहतुक

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे परराज्यातील अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या करवाईत ३८ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (nandurbar-news-Foreign-liquor-seized-Traffic-was-starting-illegally)

दोन दिवसांपूर्वी धडगाव तालुक्यात अवैध मद्य वाहतुकीवर केलेल्या कारवाईत भ्रष्टाचार झाल्याच्या साम टीव्हीच्या बातमीनंतर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू केल्‍या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे परराज्यातून विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर कारवाई केली आहे. यात एकूण ३८ लाख ५१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे ही विदेशी दारू ट्रकमध्ये ठेवलेल्या फ्रुटी पेयाच्या बॉक्सच्या आड लपवून वाहतूक केली जात होती.

मद्यसाठा
पेट्रोल पंपावर ट्रक लुटीचा प्रयत्‍न; थरार सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

साम टीव्‍हीच्‍या बातमीनंतर जाग

नंदुरबार जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमा असल्याने सीमावर्ती भागातून शासनाचा महसूल बुडवून मोठ्या प्रमाणावर अवैध मार्गाने दारूची तस्करी केली जाते. या पोलीस प्रशासन देखील भ्रष्टाचार करत असल्याचे धडगाव तालुक्यात दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत समोर आले आहे. साम टीव्हीच्या बातमीने प्रशासन जागे झाले असून अवैध दारू तस्करी करणार्‍यांवर कारवाई सुरू केली आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com