गतवर्षी बनविलेल्‍या गणेश मुर्ती विकल्‍याच जाईना; मुर्तीकारांना आर्थिक फटका

गतवर्षी बनविलेल्‍या गणेश मुर्ती विकल्‍याच जाईना; मुर्तीकारांना आर्थिक फटका
गतवर्षी बनविलेल्‍या गणेश मुर्ती विकल्‍याच जाईना; मुर्तीकारांना आर्थिक फटका
गणेश मुर्ती

नंदुरबार : कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षापासून मोठ्या गणेश मूर्तींवर लागलेल्या निर्बंधांमुळे १० ते १५ फूट उंचीच्या तयार केलेल्या गणेश मूर्ती विकल्या गेल्या नाही. यामुळे मूर्तिकारांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. (nandurbar-news-Ganesh-idols-made-last-year-will-not-be-sold-Financial-blow-to-sculptors)

गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती साहित्य व इतर वस्तूंसाठी केलेला खर्च विक्रीच्या माध्यमातून निघाला नसल्याने मोठ्या गणेश मूर्तीकारांवर आर्थिक संकट ओढावले आहे. गेल्यावर्षी तर मोठ्या मूर्तीसह लहान मूर्तींवर देखील शासनाच्या जाचक अटी ‘एक गाव एक गणपती’ साजरा करण्याच्या निर्बंधांमुळे संपूर्ण व्यवसाय अडचणीत सापडला होता. यावर्षी देखील तेच चित्र आहे. यामुळे गतवर्षी बनविलेल्‍या मुर्ती पडून आहेत.

गुजरात, मध्‍यप्रदेशातून मुर्ती खरेदी

नंदुरबार जिल्ह्यात गुजरात, मध्य प्रदेश तसेच मध्य महाराष्ट्रातून गणेश भक्त मूर्ती खरेदी करण्यासाठी येत असतात. परंतु कोरोनाचे निर्बंध शासनाच्या चार फुटापर्यंत मुर्ती बनवण्याच्या जाचक अटीमुळे अनेक मूर्तिकारांवर बेरोजगाराची वेळ आली आहे.

गणेश मुर्ती
पुरात दहा हजार कोंबड्या गेल्‍या वाहून; २० लाखाचे नुकसान

तर नुकसान टाळता येईल

गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आधीच १० ते १५ फूट उंचीच्या तयार केलेल्या मूर्तीं मोठ्या गणेश मंडळांना बसवण्यासाठी शासनाने मुभा दिल्यास मोठ्या गणेश मूर्तिकारांचे नुकसान टाळता येईल. यावर शासनाने उपाययोजना करावी अशी अपेक्षा गणेश मूर्तिकारांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com