जनतेला जमिनीवरचा नेता हवा; गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला

जनतेला जमिनीवरचा नेता हवा; गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
Girish Mahajan Uddhav Thackeray
Girish Mahajan Uddhav ThackeraySaam tv

नंदुरबार : राज्यभरातले शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटाकडे चालले; कारण तुम्ही हुकुमशहा म्हणुन राज करु शकत नाही. लोकांना जमिनीवरचा नेता हवा असा उपरोधात्मक टोला (BJP) भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंना लगावला आहे. (Nandurbar News Girish Mahajan)

Girish Mahajan Uddhav Thackeray
धुळ्यात शिवसेनेला खिंडार; महानगर प्रमुखाचा जय महाराष्‍ट्र

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागतील गोरजाबारी येथे जात त्याठिकाणच्या आदिवासी बांधवांसोबत दौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या आनंदाचा जल्लोष साजरा केला; यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.

स्वतःचा ठसा उमटुन दाखवा

राज्यात शिवसेनेमध्ये (Shiv Sena) सुरु असलेल्या सत्ता संघर्षात भाजपचा काहीही हात नाही. आपले अपयश लपवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेना भाजपच्या नावाने बाऊ करत असल्याची टिका माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. भाजपचा राज्यासह देशात आपला ठसा उमटला आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील स्वतःचा ठसा उमटुन दाखवा; असे म्हणत मुंबई महानगरपालीकेचा घोडेबाजार समोर आहे. त्यांना पराभव दिसत असल्याने भाजपावर खापर फोडत असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com