नंदुरबारः ग्रामपंचायतींच्‍या पोटनिवडणुकीची रणधुमाळी रंगणार

नंदुरबारः ग्रामपंचायतींच्‍या पोटनिवडणुकीची रणधुमाळी रंगणार
नंदुरबारः ग्रामपंचायतींच्‍या पोटनिवडणुकीची रणधुमाळी रंगणार
Gram panchayat election

नंदुरबार : जिल्‍ह्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या ५७ जागांसाठी पोटनिवडणुक होणार आहे. याकरीता ३० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असून या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. (Nandurbar-news-Gram-Panchayat-by-election-battle-will-be-in-full-swing)

नंदुरबार जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या ५७ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल होणार तर २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या जवळपास ५७ जागा रिक्त होत्या. या जागांवर पोटनिवडणूक घेण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पोटनिवडणूक रंगणार आहे. त्यात अनेक मोठ्या ग्रामपंचायतींचा देखील समावेश आहे.

Gram panchayat election
वर्षभरानंतर पुन्‍हा आदेश; अवैध गौण खनिज प्रकरणी होणार गुन्‍हे दाखल

२२ अधिसुचना होणार जारी

ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक राजकारण व प्रश्नावर लढविल्या जातात. त्यामुळे या निवडणुकीकडे आता लक्ष लागून आहे. निवडणूक आयोगाच्या अधिसुचनेनुसार नागरिकांचा मागास प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा ही सर्वसाधारण म्हणून गणली जाणार आहे. निवडणुकीची अधिसुचना २२ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात येणार असून ३० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ६ डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत राहणार आहे. अर्जाची छाननी ७ डिसेंबरला होणार असून माघारीची मुदत ही ९ डिसेंबर राहणार आहे. आवश्यकता वाटेल तेथे २१ डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com