Nandurbar: ग्रामपंचायत निवडणूक; अर्ज भरणाऱ्यांची तहसील कार्यालयांत गर्दी

ग्रामपंचायत निवडणूक; अर्ज भरणाऱ्यांची तहसील कार्यालयांत गर्दी
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : नंदुरबार जिल्‍ह्यातील शहादा व नंदुरबार या दोन तालुक्‍यांतील ग्रामपंचायतींची निवडणूक नुकताच पार पडली. यानंतर आता चार तालुक्‍यांमधील ग्रामपंचायतींची (Gram Panchayat) निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे संबंधीत तहसिल कार्यालयात अर्ज भरणाऱ्यांची आज गर्दी झाली होती. (Nandurbar Gram Panchayat Election)

Nandurbar News
Crime: धक्‍कादायक..मित्रांना सांगून प्रेयसीवर केला प्राणघातक हल्ला

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार (Nandurbar) या दोन तालुक्यांमध्ये १४९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील ४५, अक्राणी तालुक्यातील २५, तळोदा तालुक्यातील ५५ व नवापूर (Navapur) तालुक्यातील ८१ अशा एकुण २०६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार चारही तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तहसील कार्यालयांमध्ये अर्ज भरण्यासाठी गर्दी केल्याने यात्रेचे स्वरूप आले होते.

इंटरनेटही स्लो

निवडणूक अर्ज भरताना उमेदवारांना ऑनलाइन माहिती भरण्यासाठी अनेक ठिकाणी इंटरनेट स्लो असल्यामुळे उशिरा रात्रीपर्यंत अर्ज भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना स्वतःच्या माहितीसह पत्नी, मुले, गाडी घोडे, शेती, व्यवसाय, नवीन बँक खाते इतर सर्व बाबी ठळकपणे मांडाव्या लागत असल्याने सुरुवातीपासूनच मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा पर्याप्त नसल्याने उशिरा रात्रीपर्यंत अर्ज भरण्यासाठी थांबावे लागत आहे. अर्ज भरणाऱ्यांची संख्या पाहता चारही तालुक्यांमध्ये हजारोंच्या संख्येने सदस्य व सरपंच पदासाठी उमेदवारी दाखल होण्याचे चित्र आहे. पुढील दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असल्याने सरकारीबाबूंना ही थोडा आराम मिळणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com