गुजरात-बडोदा मालेगाव बसचा अपघात; ७ प्रवासी किरकोळ जखमी
बस अपघात

गुजरात-बडोदा मालेगाव बसचा अपघात; ७ प्रवासी किरकोळ जखमी

गुजरात-बडोदा मालेगाव बसचा अपघात; ७ प्रवासी किरकोळ जखमी

नंदुरबार : नवापूर पिंपळनेर रस्त्यावर गुजरात परिवहन महामंडळाची बडोदा– मालेगाव बसचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यात ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून २ जण गंभीर जखमी आहेत. (nandurbar-news-Gujarat-state-Baroda-Malegaon-bus-accident-7-passengers-slightly-injured)

नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळपासूनच हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. सकाळ सत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नवापुर– पिंपळनेर रस्त्यावर रायपूर गावाच्या नदीजवळ अरुंद रस्त्यामुळे समोरून येणाऱ्या ट्रकला साईड देताना गुजरात परिवहन विभागाच्या मालेगाव बडोदा बस पलटी झाली. बस मालेगावहून गुजरात राज्यातकडे जात असताना रायपूर गावाजवळ अरुंद रस्त्यामुळे अपघात झाला. दरम्यान बसमध्ये २२ ते २५ प्रवासी होते.

बस अपघात
‘मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज’ वेबसाईडवरून काढली माहिती; कुटुंबावर प्राणघातक हल्ला

काच फोडून प्रवाशांना काढले बाहेर

सदर अपघातात यात सात ते आठ प्रवाशांना मुक्का मार लागला असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. नवापूर पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढून दुसर्‍या बसने रवाना करण्यात आले. तर जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधील प्रवाशांना बसचा पुढील काच फोडून बाहेर काढण्यात आले. यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. नवापूर पिंपळनेर रस्ता अरुंद असल्याने येथे नेहमी अपघात होत असतात या रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com