Shahada: पोलीस बंदोबस्तात मारुती मंदिरात महाआरती, हनुमान चालीसाचे पठण

पोलीस बंदोबस्तात मारुती मंदिरात महाआरती, हनुमान चालीसाचे पठण
Nandurbar
NandurbarSaam tv

नंदुरबार : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात हनुमान चालीसाचे पठन करण्याबाबत इशारा कार्यकर्त्यांना दिला होता. त्या अनुषंगाने शहादा शहरातील श्री प्रेस मारुती मंदिरात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मनसे (MNS) कार्यकर्त्यांच्यावतीने महाआरती व हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले.‌ (nandurbar news Hanuman Chalisa at Maruti Mandir under police protection)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हनुमान चालीसाचे पठण सुरूच राहणार असल्याचा इशारा काल दिला होता. त्या अनुषंगाने शहादा येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आदेशाचे पालन करत मशिदीवरील भोंग्यांविरोधात हनुमान चालीसा पठण केले. दरम्यान जातीय तेढ निर्माण होऊ नये. यासाठी पोलिसांनी (Police) चोख बंदोबस्त लावला होता. यावेळी शहादा शहरातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com