Marriage Invitation Card: नादखूळा! अख्ख्या गावात डान्स करत हसमुख वाटताेय लग्न पत्रिका

Nandurbar News Today: लग्न गरिबांच्या घरचे असो की श्रीमंताचे पत्रिका वाटण्यासाठी हसमुख डान्सर तयारच असतो.
Marriage Invitation Card:
Marriage Invitation Card:Saam Tv

सागर निकवाडे

Nandurbar News: सध्या आमंत्रण पत्रिका पाठवण्याच्या हायटेक पद्धती आहेत. कोणी व्हॉट्सअ‍ॅपवर तर कोणी कुणी कुरिअरने तर कुणी स्पीड पोस्टने पत्रिका पाठवत असतो. मात्र नंदूरबार जिल्ह्यातील वाण्याविहीर परिसरात आजही एक तरुण परिसरातील लग्न असो किंवा काही उत्तरकार्य असो याच्या पत्रिका परिसरातील आठ ते दहा गावात घरोघरी जाऊन वाटतो. त्यासाठी तो कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाही.लग्न गरिबांच्या घरचे असो की श्रीमंताचे पत्रिका वाटण्यासाठी हसमुख डान्सर तयारच असतो.(Latest Marathi News)

Marriage Invitation Card:
Satara Crime News : दारूच्या नशेत तर्रर्र... मुख्यालयातील पाेलिस निरीक्षकाला पब्लिकने बेदम चाेपला, व्हिडिओ व्हायरल झाला ना भाऊ

अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील हरेसींग वळवी यांची या परिसरात हसमुख डान्सर म्हणून ओळख आहे. परिसरातील दहा ते पंधरा गावात कुणाकडे लग्न असो किंवा काही उत्तरकार्य याच्या पत्रिका वाटण्याची जबाबदारी असो हरसिंग पूर्ण करतो. (Nandurbar News)

कोणत्याही प्रकारची मोबदल्याची अपेक्षा न ठेवता गावातील घरोघरी जाऊन हरसिंग आमंत्रण पत्रिका देत असतो. त्याला याचा मोबदला कधी मिळतो तर कधी नाही. मात्र लग्नकार्यातील सांस्कृतिकपणा कायम ठेवण्यासाठी हरसिंग स्वखर्चाने गावातील लग्नात जाऊन डान्स ही करत असतो.

Marriage Invitation Card:
India Monsoon Update: प्रतीक्षा वाढली! मान्सूनचा प्रवास लांबला, केरळमध्ये 3 ते 4 दिवस उशिराने दाखल होणार

आपल्या संस्कृती आपली कला टिकविण्यासाठी त्याच्यासोबत आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी हे कार्य करत असल्याचा तो सांगतो. मात्र हे कार्य करत असताना तो आपल्या घराचा उदरनिर्वाह स्वतःची शेती (Farming) करून करत असतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com