Tapi River Flood: तापी नदी धोक्याच्या पातळीवर; नदी काठावरच्या गावांना सावधानतेचा इशारा

Nandurbar News : तापी नदी धोक्याच्या पातळीवर; नदी काठावरच्या गावांना सावधानतेचा इशारा
Tapi River Flood
Tapi River FloodSaam tv

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यासह जळगाव व हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे (Nandurbar) धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघळण्यात आले आहेत. परिणामी टाळी नदीला पूर आला असून नंदुरबार जिल्हयात तापी नदी (Tapi River) धोक्याच्या पातळीजवळ आहे. (Latest Marathi News)

Tapi River Flood
Manoj Jarange Patil News: जरांगे पाटलांना केले रुग्णालयात रवाना; अवयवांवरील परिणामांची होणार तपासणी

तापी नदी आणि तिच्या उपनद्यांच्या उगम क्षेत्रात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. तापी नदीला यांचा दुसरा मोठा पूर आला आहे. मात्र नंदुरबारमधून गेलेल्या या नदीला पहिलाच पूर आहे. (Hatnur Dam) सध्या तापी नदी ११० मीटर पातळीवर वाहत असून सध्या नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी ११० मीटरवर आहे.  

Tapi River Flood
Nandurbar News : १५ दिवसांपासून रुग्णवाहिका नादुस्त; आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांचे हाल

सावधानतेचा इशारा 

हतनूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाच्यावतीने नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या तापी नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे तापी नदीला या वर्षाचा सर्वात मोठा पूर आला असून प्रकाशा गावाजवळ 111 मीटर ला तापी नदीची धोक्याची पातळी आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com