नंदुरबार तापले; जिल्ह्याचा पारा ४५ अंशावर

नंदुरबार तापले; जिल्ह्याचा पारा ४५ अंशावर
नंदुरबार तापले; जिल्ह्याचा पारा ४५ अंशावर
TemperatureSaam tv

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात ४४.९ अंश सेल्सिअस इतक्या तापमाना‍याची नोंद करण्यात आल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान यंदा मार्चपासूनच तापमानाचा (Temperature) पारा चाळीशी पार गेला आहे. २८ एप्रिल रोजी तब्बल ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. (Nandurbar news heat wave District mercury at 45 degrees)

Temperature
गटारीचे पाणी घरात व मंदिरात; संतप्त नागरिकांनी गटारीचे पाणी आणून केला निषेध

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात जवळपास एक मे पासून तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्यावर कायम असल्याची नोंद झाल्याचे कोळदा कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी सांगितले आहे.

काही दिवस उष्णता

आणखी काही दिवस तापमानाचा पारा कायम राहणार असून अजून तापमान वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी हवामान केंद्रातर्फे (Meteorological Department) सांगण्यात आले आहे. उन्हाच्या तीव्र झळापासून नागरिकांनी तसेच शेतकर्‍यांनी (Farmer) शेती पिकांची व स्वतःची आणि पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.