३५ वर्षांपासून महावितरणाचा बेकायदेशीर ताबा; न्यायालयाच्या दणक्यानंतर कार्यालय खाली करण्याची नामुष्की

३५ वर्षांपासून महावितरणाचा बेकायदेशीर ताबा; न्यायालयाच्या दणक्यानंतर कार्यालय खाली करण्याची नामुष्की
३५ वर्षांपासून महावितरणाचा बेकायदेशीर ताबा; न्यायालयाच्या दणक्यानंतर कार्यालय खाली करण्याची नामुष्की
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : गेल्या 35 वर्षापासून बेकायदेशीररित्या महावितरणाचा ताबा असलेल्या कार्यालयीन जागेवर न्यायालयाच्या आदेशाने जागेच्या मालकाला ताबा मिळाला आहे. एरवी इतरांचे वीज कनेक्शन कट करणाऱ्या महावितरण (MSEDCL) कंपनीच्या कार्यालयावर मूळ मालक मदनलाल जैन यांनी वीज पडल्याने एकच चर्चा सुरू आहे. (nandurbar news Illegal possession of MSEDCL for 35 years stepping down after a court case)

Nandurbar News
पाचशे रूपयांची लाच; अव्‍वल कारकून ताब्‍यात

नंदुरबार (Nandurbar) शहरातील मुख्य रस्त्यावर बसस्थानकासमोर व्यापारी मदनलाल जैन यांच्या मालकीची 40 हजार स्केअर फुट जागा 1937 साली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी 50 वर्षाच्या कराराने भाडेतत्त्वावर दिली होती. 50 वर्षासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून जागेचे मालक मदनलाल जैन यांना एका वर्षासाठी 351 रुपये भाडे असा करार करण्यात आला होता. 1987 साली सदर करार संपुष्टात आल्यानंतर जागेचे मालक मदनलाल जैन यांनी जागा खाली करून मिळावी अशी मागणी केली. महावितरण कंपनीच्या मुजोरीपणामुळे सदर जागा मालक मदनलाल जैन यांना परत न करता कार्यालयीन कामकाजासाठी वापरत राहिले.

न्‍यायालयात केला दावा दाखल

दरम्यान 2000 साली मदनलाल जैन यांनी जागेचा ताबा मिळावा; यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली. 2006 साली दिवानी न्यायालयाचा निकाल मदनलाल जैन यांच्या बाजूने लागला. तरीदेखील महावितरण कंपनीने जागेचा ताबा दिला नाही. त्यानंतर सदर केस जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असताना 2011 साली जिल्हा सत्र न्यायालयाने देखील मालक मदनलाल जैन यांना ताबा मिळावा असा निकाल लागल्यानंतरही महावितरण विभागाकडून ताबा देण्यात आलेला नव्हता. त्यानंतर मालक मदनलाल यांनी मुंबई खंडपीठ औरंगाबाद न्यायालयात धाव घेतल्यानंतर 15 नोव्हेंबर 2021 रोजी हायकोर्टाने मालक मदनलाल जैन यांना ताबा मिळावा असा निकाल दिल्यानंतर महावितरण कंपनीला गेली आठ महिने वारंवार खाली करण्यास विनंती करून देखील जागेचा ताबा देत नसल्याने आज अखेर मदनलाल जैन यांनी वकिलांचा व कोर्ट कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन येत महावितरण कार्यालय खाली करण्यास भाग पाडले आहे.

सामान अस्‍ताव्‍यस्‍त पडलेले

अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातून अखेर सामान काढून खाली करण्यास सुरुवात झाली आहे. महावितरण विभागाचा मुजोरीपणा आणि निष्काळजीपणाला अखेर खंडपीठाने दणका दिल्यानंतर कर्मचारी वठणीवर आले आहे. गेली 35 वर्ष महावितरण कंपनीने जागेचे मालक मदनलाल जैन यांना भाडे दिलेले नाही. सदर महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातून नंदुरबार शहर व परिसरात वीज वितरणाचे काम चालत होते. त्यामुळे मोठ्या सामान अस्ताव्यस्त पडलेले आहे भारतीय संविधानावर आणि न्याय व्यवस्थेवर मला पूर्ण विश्वास असल्याने मी न्यायालयीन लढा लढून माझ्या मालकीच्या जागेचा हक्क मिळविला असल्याची प्रतिक्रिया व्यापारी मदनलाल जैन यांनी दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com