नवापूर सीमा तपासणी नाक्यावर अवैधरित्या वसुली; शासनाचा महसूल बुडविला जातोय

नवापूर सीमा तपासणी नाक्यावर अवैधरित्या वसुली; शासनाचा महसूल बुडविला जातोय
नवापूर सीमा तपासणी नाक्यावर अवैधरित्या वसुली; शासनाचा महसूल बुडविला जातोय
Navapur toll plaza

नंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यातील बेडकी गावाजवळ तपासणी नाका असून परराज्यातून येणाऱ्या वाहनांची येथे तपासणी केली जाते. यात ओवरलोड किंवा विनापरवाना अवैध वाहतूकीच्‍या वाहनांवर कारवाई करत महसूल मिळतो. मात्र हा महसूल बुडवून अवैधरित्या वसुली केली जात आहे. याबाबत चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. (nandurbar-news-Illegal-recovery-at-Navapur-border-check-post-Government-revenue-is-being-squandered)

महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यातील बेडकी गावाजवळ तपासणी नाका असून परराज्यातून येणाऱ्या वाहनांची येथे तपासणी केली जाते. यात ओवरलोड किंवा विनापरवाना अवैध वाहतूक करत असलेल्या वाहनांवर कारवाई करून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. परंतु नवापूर तालुक्यातील बेडकिपाडा तपासणी नाक्यावर ओवरलोड अवजड वाहनांकडुन अवैधरीत्या वसुली करून शासनाचा महसूल बुडवला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या परिवहन विभागाचे कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस मधुकर सुरूपसिंग नाईक यांनी परिवहन विभाग व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच मोटार वाहन निरीक्षक यांनी स्वतःचे पंटर (खाजगी सुरक्षा रक्षक) ठेवलेले असून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वसुली केली जाते. वाहनचालकांकडून अमाप पैशांची मागणी केली जाते पैसे दिले नाही तर पंटरद्वारे वाहनचालकांना मारहाण केली जात असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.

हजारपेक्षा वाहनांची ये–जा मात्र कारवाई कमीच

तपासणी नाक्यावरून एका दिवसातून एक हजार पेक्षा अधिक अवजड वाहनांची ये-जा असते परंतु परिवहन विभागाद्वारे करण्यात आलेली कारवाई नगण्य आहे. गेल्या सहा महिन्यातील कारवाईची आकडेवारी पाहता महामार्गावरुन जाणाऱ्या ओव्हरलोड अवजड वाहनांची संख्या जास्त आहे, परंतु या ठिकाणी कार्यरत असलेल्या खाजगी सुरक्षारक्षकाद्वारे क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे वाहन भरलेले आढळल्यास कमी वजनाची पावती देऊन अवैध वसुली होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

Navapur toll plaza
बिजासन घाटात दरड..रात्रीत रस्‍ता केला मोकळा

अशी आहे वसुली

मार्च महिन्यात १५ ओवरलोड अवजड वाहनांवर कारवाई करून शासनाला ३ लाख ६९ हजार रुपये महसूल मिळाला आहे. एप्रिल महिन्यात ११ ओव्हरलोड अवजड वाहनांच्या कारवाईत २ लाख ६४ हजार रुपये, मे महिन्यात १९ ओव्हरलोड अवजड वाहनांवर कारवाईअंती ४ लाख ९८ हजार रुपये महसूल. जून महिन्यात ५० ओव्हरलोड अवजड वाहनांवर कारवाईत १ करोड ३ लाख ७ हजार १०० रुपये महसूल प्राप्त झाला आहे. जुलै महिन्यात ३० ओवरलोड अवजड वाहनांवर केलेल्या कारवाईत - ४२ लाख ८७ हजार १०० रू. महसूल जमा. ऑगस्ट महिन्यात एकुण ७५ हजार ५१३ वाहनांची तपासणी केली असुन १००१६ मोटर व्हेईकल कायद्यांतर्गत कारवाई करून ५६ लाख ९२ हजार रुपये महसूल शासनाला मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com