बंद असलेली आंतरराज्य बससेवा पुन्हा सुरू. गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा
msrtc busmsrtc bus

बंद असलेली आंतरराज्य बससेवा पुन्हा सुरू. गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

बंद असलेली आंतरराज्य बससेवा पुन्हा सुरू. गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारकडून बससेवा बंद करण्यात आली होती. परंतु आता कोरोना नियंत्रित झाल्याने ७ जूनपासून राज्यातील बस सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत बंद असलेली आंतरराज्य बससेवा देखील सुरू करण्यात आली आहे. (nandurbar-news-Interstate-bus-service-resumes-Consolation-to-the-passengers-going-to-Gujarat)

कोरोना महामारीमुळे लॉकडाउन लावण्यात आला होता. यात राज्‍य परिवहन महामंडळाची बससेवा पुर्णपणे बंद होती. शिवाय रेल्‍वेसेवा देखील पुर्ण क्षमतेने सुरू नसल्‍यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत होते. दरम्‍यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवू लागल्‍याने महामंडळाने राज्‍यातंर्गत बससेवा सुरू केली. मात्र आंतरराज्‍य सेवा बंदच ठेवली होती. आता मात्र यास देखील हिरवा कंदील मिळाला आहे.

msrtc bus
ईडीची सूडबुद्धीने कारवाई ; एकनाथ खडसे

दोन्‍हीकडून बससेवा

प्रवाशांनी आंतरराज्य बससेवा सुरू करावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने आंतरराज्य बससेवा जळगाव परिवहन विभागाने सुरू केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याप्रमाणे गुजरात राज्य परिवहन महामंडळाने देखील महाराष्ट्र राज्यात गुजरातच्या बस सुरू केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना आता सोयीचे झाले आहे.

येथून सुटतात बस

महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात जळगाव परिवहन विभागातील चोपडा- सुरत, चाळीसगाव- सुरत, अमळनेर- बडोदा, पाचोरा- सुरत, एरंडोल- सुरत, जळगाव- वापी, जामनेर- सुरत बस रवाना झाल्या आहेत. तर गुजरात राज्यातील सुरत-शिर्डी, सुरत- मालेगाव, सुरत- नवापूर बस महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. या निर्णयाने महामंडळाचे आर्थिक चक्र गतिमान होण्यास मोठी मदत होणार आहे. कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बससेवा बंद असल्याने महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com