Jalyukt Shivar Yojana: शेतकऱ्यांचा पाण्यासाठी टाहाे, 'जलयुक्त'चा बंधारा ठरताेय शाे पीस, कॅनाॅल बांधणीची गरज

Nandurbar News: शासनाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीला पाणी मिळत नाही आहे.
jalyukt shivar yojana
jalyukt shivar yojanaSaam Tv

सागर निकवाडे

Nandurbar News Today: नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळाच्या झडा सहन करत आहे. त्यासाठी शासनाकडून पावसाळ्याचे पाणी अडवणे जाण्यासाठी बंधारे बांधण्यात आलेले आहेत. मात्र शासनाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीला पाणी मिळत नाही आहे.

नंदुरबार तालुक्यातील रनाळा या गावातील शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवारातून बंधारा बांधण्यात आलेला आहे. परंतु या बंधाऱ्याला आजूबाजूला कॅनॉल नसल्यामुळे पावसाळ्याचे पाणी अडवलं जात नाही आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना (Farner) शेती नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच शेती पिकांना देखील पाणी नसल्याने, मोठी समस्या उद्भवत आहे. (Latest Marathi News)

jalyukt shivar yojana
Cyclone Biparjoy: अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ; या राज्यांना सतर्कतेचा इशारा

शासनाने लाखो रुपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र या बंधार्‍यांच्या व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे पावसाच्या पडणार पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून दुसऱ्या गावांना जात आहे. परंतु या शेतकऱ्यांना शेतीला आणि पिण्यासाठी पाणीच नाही मिळत आहे. शासनाकडून करण्यात येणारा खर्चाच्या खरच उपयोग होत आहे. का असेच काहीसा प्रश्न या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. (Jalyukt Shivar Yojana)

ग्रामीण भागात शेतीला पाणी मिळावं यासाठी बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या बंधाऱ्यांवर कॅनॉल आणि पाणी अडवण्यासाठी बाऱ्या बांधल्या तर हजारो लिटर पाणी अडवलं जाणार असून याच्या फायदा पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. (Marathi News)

jalyukt shivar yojana
Maharashtra Politics: "डबल इंजिन सरकारला ‘तेलपाणी’ करण्यासाठी वारंवार दिल्लीच्या सर्व्हिसिंग स्टेशनला जावं लागतंय"

तर तालुक्यातील पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांना याच्या लाभ होणार असल्यामुळं हा परिसर सुभलाम सुफलाम होऊ शकतो. मात्र प्रशासनाच्या उदासीनतामुळे शेतकऱ्यांना आज दोन घोट पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. त्यासाठी शासनाने लक्ष देऊन या ठिकाणी बाऱ्या आणि कॅनल बसवण्याची मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com