नाबार्डच्या माध्यमातून १४ राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज वाटप

नाबार्डच्या माध्यमातून १४ राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज वाटप
नाबार्ड
नाबार्ड

नंदुरबार : बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा; असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले. यावेळी नाबार्डच्या माध्यमातून १४ राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज वाटप केले. (nandurbar-news-Loan-disbursement-through-14-nationalized-banks-through-NABARD)

नंदुरबार येथील शिवाजी नाट्य मंदिर येथे कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपाडे, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक प्रमोद पाटील तसेच विविध बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत सरकार वित्त मंत्रालय यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये बँकेमार्फत १६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत क्रेडिट आउटरिच अभियान मेळावे सुरु आहे. या मेळाव्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत असून या अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा. कृषी विभागाच्या आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्जाची व ते घेण्यासाठी आवश्यक प्रक्रीयेची माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपाडे यांनी सांगितले, की मेळाव्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड, एमएसएमई व रिटेल ग्राहकांसाठी बँकांच्या कर्जसुविधा, स्टॅन्डअप इंडिया, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री स्वयंनिधी योजना, कृषी पायाभूत निधी योजना, सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, पीएमईजीपी, सीएमईजीपी तसेच अन्य केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना, कृषी पायाभूत सुविधा, पशुपालन इन्फ्रास्ट्रक्चर विकास निधी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना आणि जनधन योजना, पीक कर्ज योजना या सारख्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून यासाठी जिल्हाभरात मेळावे घेण्यात येणार आहे.

नाबार्ड
उघड्यावरील दूषित मास्कमुळे संसर्गाचा धोका

यांना झाले कर्ज वाटप

जिल्हाधिकारी खत्री यांच्या हस्ते वाघेश्वरी महिला बचत गट, खामगाव, यश महिला स्वंयम संस्था समुह, वैदाणे, सुवर्णा महिला स्वंयम सहायता बचत गट, वैदाणे, नवनाथ कृपा महिला स्वंयम संस्था समुह, रंजाळे, भानुबाई खंडोबा महिला स्वंयसहायता समुह, वटबारे, एकलव्य महिला स्वयंम संस्था समुह, मंजारे, भवानी माता स्वंयम सहायता समुह, खामगाव, राममंदिर महिला स्वंयम सहायता समुह, वावद, श्री स्वामी समर्थ महिला स्वंयम सहायता, खोक्राळे, वैष्णवी महिला स्वंयम संस्था, बोराळे, प्रियाशू महिला बचत गट, नंदुरबार अशा ११ महिला बचत गटाना १५ लाख २८ हजार रुपयांचे कर्ज मंजूरीच्या आदेशाचे वितरण करण्यात आले. तसेच सुभाष पाटील यांना २ लाख ५१ हजार, कांन्तीलाल पाटील १ लाख ५० हजार, अंबालाल पाटील १ लाख ५० हजार तर शुभम पाटील यांना २ लाख 90९० हजार रुपयांचे पीककर्ज मंजूरीचे आदेश वितरण करण्यात आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com