Lumpy Virus: नंदुरबार जिल्ह्यातील 18 गावांमध्ये लम्‍पीचा अहवाल पॉझिटिव्ह; पाच किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित

नंदुरबार जिल्ह्यातील 18 गावांमध्ये लम्‍पीचा अहवाल पॉझिटिव्ह; पाच किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित
Lumpy Virus
Lumpy VirusSaam tv

नंदुरबार : जिल्ह्यातील अठरा गावांमध्ये जनावरांचा लंम्‍पी स्कीन संसर्गाच्या (Lumpy Disease) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्या गावांच्या पाच किलोमीटर परिसर बाधित घोषित करण्यात आल्‍याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी दिली. (Nandurbar News Lumpy Virus)

Lumpy Virus
शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन; पीकविमा, ओल्या दुष्काळाची मागणी

नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील मौजे दहिंदुले खु, शहादा तालुक्यातील मंदाणे, तितरी, गणोर, अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील ब्रिटीश अंकुशविहीर, रामपूर, वेली, सुरगस, अक्राणी तालुक्यातील केलापाणी, रोषमाळ ब्रु,कामोद ब्रु, मोख खु,केला खु,काकरदा व उमरीगव्हाण, तसेच तळोदा (Taloda) तालुक्यातील तळोदा, लाखापूर फॉरेस्ट, जुवानी फॉरेस्ट येथील जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीज या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील अन्य ठिकाणी होवू नये म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार संसर्ग क्षेत्रापासून पाच किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून म्हणून घोषित करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

वाहतूक, बाजार बंद

बाधित तालुक्यातील बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करुन 5 किलोमीटर परिघातील जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. बाधित क्षेत्राच्या भोवतातील पाच किलोमीटर परिघातील सर्व गावांतील फक्त गोवर्गीय जनावरांना गोट पॅाक्स लसीची मात्रा देऊन 100 टक्के लसीकरण करण्यात यावे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com