नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद; बाजार राहणार सुरु

नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद; बाजार राहणार सुरु
नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद; बाजार राहणार सुरु

नंदुरबार : महाविकास आघडितर्फे आज महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात मात्र बंदला समिश्र प्रतिसाद असल्याचे पाहण्यास मिळत आहे. धडगाव आठवडी बाजार असल्यामुळे खेड्यावरून येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी बाजारपेठ सुरू राहणार आहे. (nandurbar-news-mahavikas-aaghadi-maharshtra-bandh-not-responce)

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी उत्तर प्रदेश येथील शेतकरी हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला नंदुरबार जिल्ह्यात सकाळच्या दरम्यान संमिश्र प्रतिसाद दिसून येत आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला असला तरी अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, दवाखाने, भाजीपाला, शाळा- कॉलेजेस, एसटी बस प्रवासी वाहतूक पूर्णपणे सुरू आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, तळोदा, शहादा, नंदुरबार, नवापूर या तालुक्यांमध्ये सकाळच्या दरम्यान बंदला संमिश्र प्रतिसाद असला तरी दुर्गम भागातील धडगाव तालुक्यात आज आठवडी बाजार असल्याने खेड्यापाड्यावरून येणाऱ्या नागरिकांना बंदबाबत माहिती नसल्याने व्यापाऱ्यांना धडगाव बाजारपेठ खेड्यावरून येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू करावी लागली आहे.

शिवसेना- राष्ट्रवादीकडून प्रतिसाद नाही

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुकारलेल्या बंदला काँग्रेस व्यतिरिक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीने पाहिजे तेवढा प्रतिसाद दिलेला नाही. जिल्ह्यात फक्त काँग्रेसच्यावतीने पत्रक काढून बंदला पाठिंबा दिलेला आहे.

Related Stories

No stories found.