Corona: कोरोना प्रतिकृती तयार करून आठवडे बाजारात फिरस्‍ती

कोरोना प्रतिकृती तयार करून आठवडे बाजारात फिरस्‍ती
Corona: कोरोना प्रतिकृती तयार करून आठवडे बाजारात फिरस्‍ती
Coronasaam tv

नंदुरबार : सध्या कोरोनाच्या नव्या संसर्गाची भिती पसरली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून कोरोना नियमांच्या पालनासह लसीकरण मोहीमेवर भर दिला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात एनएसईच्या आर्थिक सहकार्य व नंदुरबार जिल्हा परिषद (Nandurbar ZP) यांच्या संयुक्त विद्यमाने सीवायडीए संस्था संपुर्ण जिल्ह्यात प्रकल्प कवच राबवत आहे. (nandurbar news market awareness by creating a corona replica)

Corona
Crime: बेशुद्ध होईपर्यंत वाळू माफियांची शेतकऱ्याला मारहाण; आव्हाण्यातील प्रकार

नवापूर (Navapur) तालुक्यातील विसरवाडी आठवडे बाजारात प्रत्येक विक्रेत्यास व बाजार करणाऱ्या ग्राहकास आणि ग्रामस्थांना कोरोना (Corona) प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. विसरवाडी आठवडे बाजारात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Corona Vaccination) जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

जनजागृती उपक्रम

कोरोना प्रतिकृती तयार करून ग्रामीण भागातील गावांमध्ये लसीकरण प्रमाणात वाढ करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करणे, लसीकरण शिबिरात सहकार्य करणे, वाहतूक व्यवस्था करणे, समुपदेशन करून नागरिकांना लसीकरणाबाबत असणारी भीती व गैरसमज दूर करणे, मास्क लावून फिरणे, सोशल डिस्टन्स अवलंबून सेनिटाइझर वापर करावा. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.