गादी भंडार, टायर गोडावूनला आग

गादी भंडार, टायर गोडावूनला आग
गादी भंडार, टायर गोडावूनला आग
fire

नंदुरबार : मलोणी (ता. शहादा) येथील न्यू महाराष्ट्र गादी भंडार व टायर गोडावूनला आज सकाळी आग लागली. आगीत दोन्ही गोडाऊन जळून खाक झाले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

fire
वीजबिल वसुलीसाठी गेलेल्‍या महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण

शहादा (Shahada) शहरातील मलोणी रस्त्यावरील कापूस आणि टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागली. अगदी काही वेळातच आगीने रौद्र रूप घेतले. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. गोडावूनला आग लागल्‍याने परिसरातील नागरीकांनी धावपळ केली. तसेच अग्‍नीशामक कार्यालयाला माहिती दिल्‍यानंतर अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्‍या असून अग्निशामक दल दाखल आग विझवण्यात आली.

आगीचे कारण अस्‍पष्‍ट

गोडावूनला लागलेल्‍या आगीचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. गादी भंडार असल्‍याने कापून व कापडामुळे आग लवकर पसरली. तर शेजारी असलेल्‍या टायर गोडावूनमधील टायरमुळे आग अधिक भडकत आसल्याने आग विझवण्यासाठी अडचणी येत होत्‍या.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com