
नंदुरबार : सध्या राज्यात भोग्यांचे नाही; तर भोंगळ राजकारण सुरु असल्याची टिका जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्यां मेधा पाटकरांनी केली आहे. एका धर्माच्या मतांचे गठ्ठे मिळवण्यासाठी हि सर्व उठाठेव असून यातुन एकाच (Nandurbar News) धर्माला लक्ष करण्याचा हा सारा प्रकार अमानवीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (nandurbar news medha patkar press and statement maharashtra politics)
अस्मितेचे प्रश्न उठवायचे आणि अस्तित्वाचे प्रश्न नाकारायचे असे सध्याच्या राजकारणाचे स्वरुप झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) सारख्या राज्यात हिंदु मंदिरांमधुन भल्या पहाटे आरती आणि पुजापाठ होत असल्याचा दाखला देत त्यांनी महाराष्ट्रातील सर्व भोंगे प्रकरणावर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) सरकारने कोणालाही न घाबरता सक्त कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.
भिमा कोरगाव प्रकरणात निरपराध कार्यकर्त्यांनाच गोवले गेले असुन ज्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले अशांनाच जेलमध्ये ठेवले गेल्याचा आरोप सामाजीक कार्यकत्या मेधा पाटकरांनी केला आहे. अशातच भिडे गुरुजीं सारख्यांना या प्रकरणातुन सुट मिळणे, हे गंभीर प्रकरण असल्याचा देखील त्यांनी म्हटले आहे. या देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान वाचवायचा असेल तर अशा प्रकारच्या उद्योगाला राजकीय खतपाणी घातली गेली न पाहीजे याची दक्षता घ्यावसास हवी असल्याचे मत व्यक्त केले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.