औद्योगिक क्षेत्र जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध

औद्योगिक क्षेत्र जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध
औद्योगिक क्षेत्र जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील आदिवासींच्या गावठाण जागेत वाढीव औद्योगिक क्षेत्र जमीन अधिग्रहण करण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन अधिग्रहणासाठी आमचा पूर्णता विरोध असल्याचे निवेदन शेतकर्यांनी दिले. (Nandurbar-news-midc-land-reservation-farmer-agresive)

नवापुर तालुक्यातील मोजे नवापाडा, धुडीपाडा, नांदवन, सुळीसह अनेक आदिवासी गावातील महसूल गायचारण व गावठाणच्या जमिनीत वाढीव औद्योगिक वसाहतीसाठी जमीन अधिग्रहण करण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्र शासनाच्या भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत सदर गावांच्या ग्रामपंचायतींची पूर्वसंमती व वैयक्तिक शेतकऱ्यांची परवानगी न घेता शासनाचा दबाव टाकून आदिवासींच्या जमिनी भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचा कट रचून आदिवासींवर अन्याय केला जात आहे. संविधानातील भाग दहा- अनुच्छेद २४४(१) व महाराष्ट्र शासनाने अधिनियमित केलेले महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९९६ नुसार सदर गावे आदिवासी पेसा क्षेत्रात मोडत आहे. या गावांमध्ये राहणारे अल्पभूधारक आदिवासी शेतकरी असून निसर्ग व पारंपारिक शेतीवर अवलंबून आपली उपजीविका करतात. जमीन अधिग्रहण झाल्यास येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल त्यामुळे औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन अधिग्रहणासाठी आमचा पूर्णता विरोध असल्याचे निवेदन शेतकऱ्यांनी नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी व नवापूर विधानसभेचे आमदार शिरीष कुमार यांना दिले आहे.

आन्दोलनाचा इशारा

सदर गावांच्या गावठाण व गुरचारण क्षेत्रात जमीन अधिग्रहण आदेश तात्काळ मागे घ्यावे. अन्यथा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com