आदिवासी विकास खाते माझ्याकडे राहील : के. सी. पाडवी यांनी व्‍यक्‍त केली अपेक्षा

आदिवासी विकास खाते माझ्याकडे राहील : के. सी. पाडवी यांनी व्‍यक्‍त केली अपेक्षा
आदिवासी विकास खाते माझ्याकडे राहील : के. सी. पाडवी यांनी व्‍यक्‍त केली अपेक्षा
के. सी. पाडवी

नंदुरबार : कॉंग्रेसच्या दोन मंत्र्यांना मंत्रीमंडळातून डच्चू मिळणार अशी चर्चा आहे. या बातमीला आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी दुजोरा दिला आहे. तसेच माझ्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असली तरी आदिवासी विकास खाते माझ्याकडेच राहील अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केली. (nandurbar-news-minister-padvi-statment-vidhansabha-president-selection)

पाडवी म्‍हणाले, की माझ्याबाबतीत उलट सुलट चर्चा आहे. याबाबत त्यांनी स्वतः बोलून ही दाखवले आहे. परंतु, सात वेळा निवडून आलो तसेच यापुर्वी मंत्री देखील नाकारले होते. यामुळे आदिवासी विकास खाते हे मला दिले आहे आणि ते खाते पक्षातील सिनिअर म्‍हणून माझ्याकडेच राहिल अशी अपेक्षा देखील त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

के. सी. पाडवी
कुत्र्याने बालकास जबड्यात धरून नेले फरफटत; नागरीकांमुळे झाली सुटका

अध्‍यक्ष बनवण्यासंदर्भात निर्णय हायकामंडचा

विधानसभा उपाध्यक्ष पदाच्या पक्षाने विचारणा या आधी ही केल्या आहेत. आता नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय; तो वाद सध्या सुरू आहे. अध्यक्ष बनवण्यासंदर्भात हायकामंड जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com